लेकीला शेवटचे डोळेभरूनही बघू शकला नाही बाप, चिमुकलीवर आई-वडिलांविना अंत्यसंस्कार

लेकीला शेवटचे डोळेभरूनही बघू शकला नाही बाप, चिमुकलीवर आई-वडिलांविना अंत्यसंस्कार

हिंदवीचे वडील हे सैन्यात आहे. मुलीच्या निधनाची आणि मुलाच्या जन्माची माहिती मिळताच त्यांच्यावरही मोठा आघात झाला आहे.

  • Share this:

बीड, 13 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. राज्याच्या, जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे अनेक जण आपल्या घरी पोहोचू शकले नाही. बीडमधील एका अडीच वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण सैन्यात असलेल्या वडिलांना आपल्या लाडाच्या लेकीला शेवटचं पाहताही आलं नाही.

बीड जिल्ह्यातील  केज तालुक्यातील युसूफवडगाव राहणाऱ्या निकम कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. निकम कुटुंबातील हिंदवी या अडीच वर्षाच्या चिमुरडीचा दोन दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. सोलारची टाकी अंगावर पडून हिंदवीचा करूण अंत झाला.

हेही वाचा - शिवसेनेनंतर नितेश राणेंचा मोर्चा आता राष्ट्रवादीकडे, असा लगावला टोला

हिंदवीची आईही गरोदर होती. त्यामुळे शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यामुळे हिंदवी आपल्या आजीसोबत घरी होती. हिंदवी घराच्या गच्चीवर चुलत भावासोबत खेळत होती. तेव्हा  सोलरच्या टाकीच्या शेजारी खेळत असताना अचानक टाकीच हिंदवीच्या अंगावर कोसळली. जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.

हिंदवीची आई प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल आहे. त्यांनी एका मुलाला जन्म दिला. परंतु, लाडक्या लेकीच्या मृत्यू झाल्याची माहिती अजून त्यांना देण्यात आली नाही. एकीकडे मुलाच्या जन्माचा आनंद आहे तर दुसरीकडे मुलीच्या मृत्यूचे दु:ख आहे. त्यातच आईची प्रकृती अस्थिर असल्यामुळे त्यांनाही अजून याबद्दल माहिती देवू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

हेही वाचा - 'तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर...', पोलिसांचा हा VIDEO पाहाच

हिंदवीचे वडील हे सैन्यात आहे. मुलीच्या निधनाची आणि मुलाच्या जन्माची माहिती मिळताच त्यांच्यावरही मोठा आघात झाला आहे. संदीप निकम हे सध्या आसाममध्ये कर्तव्य बजावत आहे. मुलीच्या अंत्यसंस्काराची माहिती मिळताच संदीप निकम हे बीडकडे रवाना झाले आहे. परंतु, ते अजूनही प्रवासातच आहे.

दोन दिवस उलटले पण या चिमुकलीच्या अंत्यसंस्कारास तिचे आई-वडिल दोघेही येऊ शकले नाहीत. लॉक डाऊन मुळे भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असलेले वडील संदीप निकम अडचणीमुळे अजूनही प्रवासात आहेत तर आई प्रसुतीमुळे दवाखान्यात आहे. शेवटी गावकऱ्यांनी आणि नातेवाईकानी या चिमुकलीचे अंत्यसंस्कर आटोपून घेतले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 13, 2020, 3:18 PM IST

ताज्या बातम्या