शिवसेनेनंतर नितेश राणेंचा मोर्चा आता राष्ट्रवादीकडे, असा लगावला टोला

शिवसेनेनंतर नितेश राणेंचा मोर्चा आता राष्ट्रवादीकडे, असा लगावला टोला

नितेश राणे यांनीही एका योजनेवरून राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : भाजपचे कोकणातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे हे वारंवार शिवसेनेवर हल्लाबोल करत असतात. मात्र राणे कुटुंबाने आता आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता नितेश राणे यांनीही एका योजनेवरून राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे.

राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेने 'शरद भोजन योजना' या नावाने अन्नवाटपासंदर्भात एक योजना सुरू केली आहे. यावरूनच नितेश राणे यांनी राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेवर भाष्य करताना नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, 'छान, पण...राज्यात महाविकास आघाडीची शिव भोजन योजना सगळीकडे सुरू आहे..मग..जनतेत संभ्रम नको म्हणून विचारलं.'

दरम्यान, याआधी निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. अजित पवार यांनी भाजपला कोपरखळ्या लगावल्यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली होती. 'अजित पवारांच्या कॉन्फिडन्सला मानावं लागेल. ज्या भाजपसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली पण एकही आमदार सोबत नाही म्हणून राजीनामा दिला, त्याच भाजपला आज टोला मारत आहेत,' असं ट्वीट करत निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: April 13, 2020, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading