Home /News /maharashtra /

डोंबिवली हादरली, बापानेच केला 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मुलींना पाजायचा दारू!

डोंबिवली हादरली, बापानेच केला 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मुलींना पाजायचा दारू!

या प्रकरणी पीडितेच्या आईने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

डोंबिवली, 30 ऑक्टोबर : सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीत (dombivali) पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या (vishnu nagar police station) हद्दीत बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.  एका बापाने आपल्याच 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (rape) केले आहेत.  धक्कादायक म्हणजे, हा बाप पीडित 9 वर्षांच्या मुलीला आणि तिच्या 8 महिन्याच्या बहिणीला दारू पाजायचा. विष्णू नगर पोलिसांनी या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित डोंबिवलीमध्ये आई वडिलांसोबत राहते. मुलींची आई कामानिमित्त गावाला गेल्याची संधी साधून बापाने पीडितेशी लगट करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. केसांसाठी खर्च केले तब्बल 35 हजार रुपये; आरशात पाहताच ढसाढसा रडू लागली महिला इतकेच नव्हे तर तिला शिवीगाळ, मारहाण करत धमकी ही दिली. याबाबत घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला. याच दरम्यान आरोपी बाप मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन भांडायचा, आठ महिन्याच्या मुलीला दारू पाजायचा. याला विरोध करणाऱ्या आपल्या पत्नीला देखील बेदम मारहाण करायचा. रोजच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीच्या आईने हिंमत केली आणि विष्णूनगर पोलीस स्टेशन गाठले. कुणीच कुणाची जिरवायला जात नसतं', शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार या प्रकरणी पीडितेच्या आईने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर लगेच घरी जाऊन विकृत बापाला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Dombivali, डोंबिवली

पुढील बातम्या