सातारा, 30 ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने (Satara District central co operative bank) जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटप प्रकरणी बँकेला ईडीने नोटीस (ed notice) बजावली आहे. या प्रकरणावरून आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale ) यांच्या कलगीतुरा रंगला आहे. 'कुणीही कुणाची जिरवायला कुठे जात नाही. त्यांची कोण जिरवणार त्यांना सल्लागारांनी सांगितलं असावं' असा टोला शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना लगावला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या नोटीस संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे माहिती मागत विचारणा केली. मात्र, बँकेच्या संचालकांनी ही माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे उदयनराजे चांगलेच संतापले. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेवरून "माझी जिरवा पण सभासदांची जिरवू नका" अशी हात जोडून संतप्त प्रतिक्रिया दिली होती.
हिवाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करताय? मग 'ही' आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणे
याला प्रत्युत्तर देत आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की, 'आम्ही मागील पाच वर्षात नेमकं काय केलं ते उदयनराजेंनी सांगावं. सभासदांना कर्जपुरवठा केला नाही किंवा पंधरा ते वीस सोसायट्यांना कर्जपुरवठा जाणीवपूर्वक बंद केला असे कुठेच काही घडलेलं नाही. मग सभासदांची जिरवली कुठे त्यांनीच आम्हाला उत्तर द्यावे' असा टोला लगावला.
तसंच, 'कुणीही कुणाची जिरवायला कुठे जात नाही. त्यांची कोण जिरवणार त्यांना सल्लागारांनी सांगितलं असावं, असा खोचक टोलाही शिवेंद्रराजे यांनी लगावला आहे.
RIP Puneeth Rajkumar: अभिनेत्याचे Unseen फोटो VIRAL; असा दिसायचा 'बेबी पुनीत'
उदयनराजे नेहमी आरोप करताना दाढीवर हात फिरवून बोलत असतात, असं पत्रकारांनी विचारलं असता शिवेंद्रराजे म्हणाले की, मला चांगली दाढी आली म्हणून ठेवली. आता त्यांना ठेवायची असेल तर त्यांनी वाढवावी. ते जर म्हटले दाढी काढून दाखवतो तर तिही काढावी लागले. काल पर्यंत मिशा आणि भुवय्यावर होतं आतापर्यंत ते दाढीवर येतील, असा टोलाही शिवेंद्रराजेंनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.