Home /News /viral /

केसांसाठी खर्च केले तब्बल 35 हजार रुपये; स्वतःला आरशात पाहताच ढसाढसा रडू लागली महिला

केसांसाठी खर्च केले तब्बल 35 हजार रुपये; स्वतःला आरशात पाहताच ढसाढसा रडू लागली महिला

आरशात पाहताच मला स्वतःलाही ओळखू शकली नाही.

    लंडन, 30 ऑक्टोबर : केसगळती (Hairfall)  ही सध्या बऱ्याच लोकांमध्ये असलेली समस्या (Hair problem). अगदी कमी वयापासूनच केस गळू लागतात आणि लवकरच टक्कल (Baldness) पडतं. केस गळू नयेत, नव्या केसांची वाढ व्हावी म्हणून लोक किती तरी उपाय करतात. पण काही वेळा हे उपाय यशस्वी होतात तर काही वेळा त्याचा उलट परिणामही होऊ शकतो. यूकेतील एका वृद्ध महिलाही टक्कल पडण्याच्या समस्येला वैतागली होती. अखरे तिने एक उपाय करण्याचा ठरवलं आणि त्याचा परिणाम पाहून तिला धक्काच बसला. यूकेतील (UK) 74 वर्षांची ब्रेंडा. एका आजारामुळे वयाच्या विसाव्या 20 वर्षांपासून तिचे केस गळू लागले. तिला टक्कल पडलं आणि तिचा आत्महविश्वासही कमी झाला आणि तिनं स्वतःला घरातच कैद करून घेतलं. असं कधीपर्यंत घरात बंदिस्त राहणार हा विचार करून तिने यावर मार्ग शोधायचं ठरवलं. ती हेअर क्लिनिकमध्ये गेली. तिच्या तिच्यावर हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplant) करण्यात आलं. हे वाचा -  उन्हात जाताच वितळतात लोक; भीतीने या गावात दिवसा कुणीच घराबाहेर पडत नाही हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया सुरू असताना ब्रेंडाच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. हेअर ट्रान्सप्लांट पूर्ण झाल्यानंतर तिच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली तिने स्वतःला आरशात पाहिलं. तेव्हा तिला रडूच कोसळलं. ती स्वतःलाही ओळखू शकत नाही. खऱ्या केसांपासून तयार करण्यात आलेले हेअर सिस्टम तिला ट्रासप्लांट केलं गेलं, जे अगदी तिचेच नैसर्गिक केस असल्यासारखं दिसत होतं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार,  ब्रेंडाचा हा व्हिडीओ टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. नेटिझन्सनी तिच्या सौंदर्यचं कौतुक केलं आहे. अगदी ती विशीतील तरुणी दिसते आहे, अशी कमेंट काही युझर्सनी केली आहे. तिचा 81 वर्षांचा नवरा ब्रायनही तिला पाहून थक्क झाला. जणू काही आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान महिलेसोबत आपण लग्न केल्यासारखं वाटतं आहे. हे वाचा - सौंदर्याच्या मोहात भयंकर अवस्था! 4 वर्षे अंथरूणाला खिळलाय जिवंत तरुणीचा 'मृतदेह' ब्रेंडाने या ट्रान्सप्लांटसाठी 350 पाऊंड म्हणजे जवळपास 35 हजार रुपये खर्च केले. ब्रेंडा म्हणाली आता मी खूप आनंदात आहे, माझा आत्मविश्वासही वाढला आहे. आता घराबाहेर पडताना तिला विचार करावा लागणार नाही. कुठेही बिनधास्तपणे फिरू शकते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Uk, Viral, World news

    पुढील बातम्या