मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बापानेच केला अल्पवयीन लेकीवर अत्याचार, गरोदर राहिल्यावर लावले लग्न, पंढरपुरातील सुन्न करणारी घटना

बापानेच केला अल्पवयीन लेकीवर अत्याचार, गरोदर राहिल्यावर लावले लग्न, पंढरपुरातील सुन्न करणारी घटना

पुण्यातील एका तरुणासोबत पीडित मुलीचे लग्न लावून दिले.त्यानंतर या तरुणाने सुद्धा तिच्यावर अत्याचार केले.

पुण्यातील एका तरुणासोबत पीडित मुलीचे लग्न लावून दिले.त्यानंतर या तरुणाने सुद्धा तिच्यावर अत्याचार केले.

पुण्यातील एका तरुणासोबत पीडित मुलीचे लग्न लावून दिले.त्यानंतर या तरुणाने सुद्धा तिच्यावर अत्याचार केले.

पंढरपूर, 29 डिसेंबर : बाप आणि लेकीच्या (daughter and father ) पवित्रा नात्याला काळिमा फासणारी घटना पंढरपूरमध्ये (pandharpur) घडली आहे. एका बापाने आपल्याच पोटच्या गोळाच्या लचके तोडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. स्वत: लेकीवर लैंगिक अत्याचार (rape) करणाऱ्या या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढपूर तालुक्यातील  एका गावात ही मन्न सुन्न करणारी घटना घडली. या नराधम बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या महिन्यांपासून सतत लैगिंक अत्याचार केले होते. त्यामुळे ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती.

मुलगी गरोदर राहिल्याचे लक्षात आल्यानंतर या नरामधाने मुलीच्या लग्नाचा घाट घातला. पुण्यातील एका तरुणासोबत पीडित मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर ही पीडित मुलगी सासरी गेली. त्यानंतर या तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. काही दिवसांनी पीडित मुलगी ही गर्भवती असल्याची माहिती त्याला कळली. त्यामुळे त्याने पीडितेला पुन्हा गावी बापाकडे आणून सोडले.

(Khajuraho मंदिरांवर कोरलेल्या कामक्रीडा मूर्तींमागचं रहस्य माहितीय का?)

दोन दिवसांपूर्वीच या अल्पवयीन पीडित मुलीची प्रसुती झाली. डॉक्टरांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता ही संतापजनक घटना समोर आली आहे.

(IND vs SA : विराटने पुन्हा केली तिच चूक, कॉमेंट्री करताना गावसकर झाले नाराज)

पोलिसांनी या पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि नराधम बापाला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे पंढरपुरात संताप व्यक्त केला जात आहे.

First published:

Tags: Rape, बलात्कार, लैंगिक अत्याचार