शेतातील कामे करून घराकडे निघाला ट्रॅक्टर, वाटेतच 13 जणांवर घातला काळाने घाला

शेतातील कामे करून घराकडे निघाला ट्रॅक्टर, वाटेतच 13 जणांवर घातला काळाने घाला

पावसाची चिन्ह दिसताच या शेतमजुरांनी घराकडे ओढ घेतली. मात्र वाटेतच शेतमजुर जात असलेल्या ट्रॅक्टरवर वीज कोसळली

  • Share this:

हैदराबाद, 15 मे : लॉकडाऊनमुळे देशातील कष्टकरी मजुरांवर ओढावलेल्या प्रसंगाबाबत हळहळ व्यक्त केली जात असतानाच आंध्र प्रदेशात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातली काम आटोपून संध्याकाळी घराकडे निघालेल्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळून 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे.

आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील माचावरम भागात हा अपघात घडला आहे. मृत 13 व्यक्तींमध्ये 11 महिला शेतमजुरांचा समावेश आहे. हे सर्व शेतमजुर शेतातील कामे आटोपल्यानंतर घराकडे निघाले. मात्र सध्या देशातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. आंध्र प्रदेशातही अशीच काहीशी स्थिती आहे. त्यातच आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आणि वीजांचा कडकडात सुरू होता.

पावसाची चिन्ह दिसताच या शेतमजुरांनी घराकडे ओढ घेतली. मात्र वाटेतच शेतमजुर जात असलेल्या ट्रॅक्टरवर वीज कोसळली. या दुर्घटनेत 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मजुरांच्या मृत्यूची मालिका

देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मजुरांचं काम बंद झाल्यानं सगळे कामगार आपल्या मूळ गावी परतत आहेत. हे कामगार घरी जाण्यासाठी धडपडत असताना त्यांचे हाल थांबत नाहीत. इतर राज्यातून येणारे स्थलांतरित कामगार सतत अपघातांना बळी पडत आहेत. गुरुवारी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे झालेल्या अपघातात एकूण 14 कामगारांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर 44 कामगार जखमी झाले आहेत.

मुंबईतून 46 कामागरांना मूळ गावी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अज्ञात वाहनानं धडक दिली आहे. या अपघातात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे बहराइच इथे 60 मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकलाही अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 मजूर जखमी झाले आहेत. सर्व जखमी मजुरांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 15, 2020, 1:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading