जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Inside Story : सांगलीमध्ये 'कोरोना'चा गुणाकार, आधी 4 आता 12 जण पॉझिटिव्ह

Inside Story : सांगलीमध्ये 'कोरोना'चा गुणाकार, आधी 4 आता 12 जण पॉझिटिव्ह

डॉ. कॅमरननी सांगितलं, डास चावल्यानं फक्त डेंग्यू, यलो फिवर, चिकनगुनिया, रोज फिवर आणि जीका व्हायरसचं संक्रमण होतं.

डॉ. कॅमरननी सांगितलं, डास चावल्यानं फक्त डेंग्यू, यलो फिवर, चिकनगुनिया, रोज फिवर आणि जीका व्हायरसचं संक्रमण होतं.

सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

आसिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली, 27 मार्च : एकीकडे राज्यात कोरोना व्हायरसच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे आज सांगलीमध्ये एकाच दिवसात तब्बल 12 जणांना लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण सांगलीत आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा हा 23 वर पोहोचला आहे.  तर राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 147 वर पोहोचली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शहरात राहणाऱ्या आणखी 25 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. यामध्ये तब्बल 12 जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हेही वाचा - सरकार आणतंय ‘Corona कवच’ अॅप, सांगणार तुमच्या आजुबाजुचा कोरोना पेशेंट 13 मार्च रोजी सौदी अरेबियामधून इस्लामपूर येथील 4 जण उमराह देवदर्शन यात्रेनंतर परतले होते.  त्यानंतर या चौघांना 10 दिवसांनी 23 मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 4 जणांना लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने या चार व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 34 हून अधिक जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केलं होतं. तरी यामधील 5 जणांना कोरोना लागण झाली होती. तर गुरुवारी त्या 4 कुटुंबातील संपर्कातील इस्लामपूर मधील 2 आणि कोल्हापूरच्या वडगाव मधील एकाला असे तिघांना कोरोना लागण झाल्याचे रिपोर्ट प्राप्त झाले होते. तर बुधवारी 22 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. ज्याचे रिपोर्ट आज आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले असून यामधील तब्बल 12 जणांना कोरोना लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. हेही वाचा - VIDEO : कोरोनाची भीती घालवण्यासाठी डॉक्टरांनी गायलं 59 वर्षांपूर्वीचं जुनं गाणं त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 23 वर पोहचली आहे. गंभीर बाब म्हणजे आतापर्यंत मुंबईपाठोपाठ पुण्याचा नंबर लागत होता. पण, आता सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज सकाळी नागपुरात आज आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. 4 रुग्ण हे नागपूरमध्ये तर 1 रुग्ण गोंदियामध्ये आढळला आहे.   दिल्लीतून नागपुरात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. गुरुवारी ज्या रुग्णाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता त्याच्याच परिवारातील 3 लोकं आणि एका मित्राला लागण झाल्याचं समोर आले आहे. या पाचही जणांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात