मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शौचालयात पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरलेल्या बापलेकाचा करुण अंत

शौचालयात पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरलेल्या बापलेकाचा करुण अंत

शौचालयात पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरलेल्या बापलेकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शौचालयात पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरलेल्या बापलेकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शौचालयात पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरलेल्या बापलेकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  बुलडाणा, 22 जून: शौचालयात पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरलेल्या बापलेकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे ही घटना घडली आहे. घटनास्थळावर तहसीलदार, पोलिस कर्मचारी, आरोग्य पथक दाखल झालं आहे. मधुकर नारायण टवलारकर (वय 55) आणि अनिकेत मधुकर टवलारकर (वय- 25)अशी मृतांची नाव आहे.

  हेही वाचा... अनलॉक नको रे बाबा! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात व्यापाऱ्यांनीच केले 'शटरडाऊन'

  मिळालेली माहिती अशी की, मधुकर टवलारकर आणि अनिकेत टवलारकर हे दोघे सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास शौचालयात 2 दिवसांपूर्वी पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरले होते. काही वेळात मधुकर टवलारकर यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला तर अनिकेत टवलारकर हा अत्यावस्थ झाला. त्याला तातडीनं अॅब्युलन्समधून रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

  अनिकेत हा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला होता. तो एकुलता एक मुलगा होता. ८ दिवस आधीच त्याच्या बहिणीचे लग्न झाल्याची माहिती आहे.

  घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, पोलिस कर्मचारी, आरोग्य पथक घटनास्थळावर दाखल झाले. या घटनेने संपूर्ण निमगावात शोककळा पसरली आहे.

  हेही वाचा.. धनंजय मुंडे यांची कोरोनावर मात; ब्रीच कँडीतून डिस्चार्ज, लवकरच सेवेत होणार रुजू

  First published:
  top videos