मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona vaccination in india : भारत कोरोना लसीकरण विक्रमाच्या उंबरठ्यावर असतानाच आली चिंताजनक बातमी; मोदी सरकारचा मोठा खुलासा

Corona vaccination in india : भारत कोरोना लसीकरण विक्रमाच्या उंबरठ्यावर असतानाच आली चिंताजनक बातमी; मोदी सरकारचा मोठा खुलासा

Corona vaccination in india : भारतातील कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने दिली मोठी माहिती.

Corona vaccination in india : भारतातील कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने दिली मोठी माहिती.

Corona vaccination in india : भारतातील कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने दिली मोठी माहिती.

  नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर :  भारत कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) नवा विक्रम गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. लवकरच देशात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण होणार आहे (Corona vaccination in india). भारतासाठी ही मोठी बातमी असताना आता एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. देशातल्या 10 कोटी नागरिकांनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतलेला नाही (Corona second dose).  पहिला डोस घेतल्यावर पुरेसा कालावधी उलटून गेल्यावरही त्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही.

  एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्यानं तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून नागरिकांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं आणि लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन सरकार आणि प्रशासन करत आहे. पण देशातले 10 कोटी नागरिक असे आहेत, की ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस (First Dose) घेतला आहे; मात्र ते दुसरा डोस (Second Dose) घेण्यासाठी आलेच नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

  हे वाचा - ...तरच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात एंट्री मिळणार; मोदी सरकारचा कडक नियम

  याबाबत नीती आयोगाचे (Niti Aayog) सदस्य व्ही. के. पॉल यांनी चिंता व्यक्त केली असून, सर्वांनी लशीचा दुसरा डोस लवकरात लवकर घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

  इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत व्ही. के. पॉल यांनी सांगितलं, देशात अजून असे 10 कोटी नागरिक आहेत, ज्यांनी लशीचा पहिला डोस घेतला परंतु, दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही. नागरिकांनी लशीसंदर्भात असलेले गैरसमज बाजूला सारून लसीकरण करून घ्यावं. लशीचा पहिला डोस घेतल्यावर अंशतः इम्युनिटी तयार होते; मात्र लशीचे दोन्ही डोस घेतल्यास चांगली इम्युनिटी तयार होते. लशीचा बूस्टर डोस (Booster Dose) गरजेचा आहे की नाही, याचा निर्णय वैज्ञानिकांनी घ्यावा. अमेरिकेसह काही देशांनी लसीचा बूस्टर डोसला परवानगी दिली आहे.

  हे वाचा - या देशात पुन्हा सुरू झाला Coronaचा हाहाकार; दररोज 1000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू

  भारतात 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झालं. त्यात आतापर्यंत 99.19 कोटी नागरिकांचं लसीकरण झालं आहे. देशातल्या 70,23,83,368 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. 28,89,54,257 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. हा आकडा अनेक देशांतील आकड्यांपेक्षा अधिक आहे.

  First published:
  top videos

   Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Sanjeevani