मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /CM Eknath Shinde : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानाचे 50 हजार मिळणार, मुख्यमंत्र्यांचा आदेश

CM Eknath Shinde : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानाचे 50 हजार मिळणार, मुख्यमंत्र्यांचा आदेश

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (farmer) काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. cm eknath shinde

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (farmer) काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. cm eknath shinde

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (farmer) काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. cm eknath shinde

मुंबई 12 जुलै : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (farmer) काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. दरम्यान याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही. याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर (mp dhairyasheel mane and mla prakash abitkar) यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी (farmer 50 thousand fund) या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.  याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी (former mp raju shetti) हे उद्या (दि.13) रोजी शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्याधिकारी (Kolhapur collector office) कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी  रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : शिंदे-ठाकरे यांच्यात जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? उदय सामंतांच्या पत्राने नवी चर्चा

आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले  आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. 

याशिवाय या योजनेत 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकाशत राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष  वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा  लाभ होणार नाही असे म्हटले आहे.

हे ही वाचा : शिंदे गटातील आमदारावर भाजपकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, ईडी-सीबीआय चौकशीची मागणी

गट तट विसरून शेतकऱ्यांच्या लढाईसाठी एकत्र या

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. मात्र, अद्याप ते पैसे जमा झाले नाहीत. सध्या सुरु असलेल्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले आहे. तत्कालीन राज्य सरकारने जाहीर केलेले प्रोत्साहनपर अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या विरोधात येत्या 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापूरमधील दसरा चौकात एकत्र येण्याच आवाहन राजू शेट्टींनी केले आहे. गट-तट, पक्ष विसरुन निर्णायक लढाईसाठी कोल्हापूरच्या दसरा चौकात उपस्थित राहा असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Farmer, Farmer protest, Raju Shetti (Politician), Shiv Sena (Political Party)