नागपूर, 12 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार स्थापन झाल्यापासून एकत्र अनेक दौऱ्यांमध्ये दिसले आहेत. शिंदे गट आणि भाजपचं सरकार कसं भक्कम आहे हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने झाला आहे. मात्र नागपुरात शिंदे गट आणि भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. मूळचे शिवसैनिक असलेले रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल (Ashish JAiswal) यांच्या विरोधात भाजपमधूनच बंडाचा झेंडा उभारण्यात आला आहे. भाजपच्या नागपूर जिल्हा ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे (Rajesh Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत आशिष जयस्वाल यांच्या भ्रष्टाचाराची, तसेच त्यांच्यासह नातेवाईक व निकटवर्तीयांच्या संपत्तीची ईडी-सीबीआयमार्फत चौकशी करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी मागणी केली. मिशन 2024! ‘संघर्षाची तयारी ठेवा, पुन्हा एकदा लढायचंय’; माजी आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश आशिष जयस्वाल हे खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी रॉयल्टीच्या नावावर खनिज संपदेची लूट केली. रेती, मुरमाची विक्री केली. शेतातून मातीमिश्रित रेती काढण्याच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी सूर नदीलगतच्या जमिनी नातेवाईक व निकटवर्तीयांच्या नावावर खरेदी केल्या. तेथील रेती काढून सरकारचा 150 कोटींचा महसूल बुडवला, असाही आरोप राजेश ठाकरे यांनी केला. एकत्रच लढूया, शरद पवारांनी दिली शिवसेना-काँग्रेसला साद, शिंदे सरकारला देणार टक्कर? आशिष जयस्वाल यांनी मॅक्सवर्थ या कंपनीशी हातमिळवणी करून रामटेक-पारशिवनी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या. पुढे यातील काही जमिनी त्यांचे बंधू अनिल जयस्वाल यांनी संबंधित कंपनीकडून खरेदी केल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. या सर्व प्रकरणाची ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करावी आणि तोपर्यंत आशिष जयस्वाल यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये मागणी भाजपच्या शेतकरी आघाडीने केली आहे. या सर्व आरोपात संदर्भात आशिष जयस्वाल यांना विचारले असता त्यांनी कॅमेऱ्यावर बोलायला नकार दिला. मात्र आरोप करणाऱ्या विरुद्ध मी न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.