नकोशी पुन्हा कचराकुंडीत! पुण्यात निर्दयी मातेनं नाळ ठेचून नवजात अर्भक फेकलं

नकोशी पुन्हा कचराकुंडीत! पुण्यात निर्दयी मातेनं नाळ ठेचून नवजात अर्भक फेकलं

धक्कादायक बाब म्हणजे मुलीची नाळ ठेचून तोडण्यात आल्यामुळे होणाऱ्या वेदनांनी पहाटेच्या थंडीत अर्भक अक्षरशः विव्हळत होतं..

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 28 ऑक्टोबर: नुकतंच जन्मलेलं नवजात अर्भक एका निर्दयी मातेनं कचराकुंडीत फेकून दिल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

शहरातील तापकीर मळा परिसरात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रस्ते सफाई करत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी नितीन सुर्यवंशी नामक व्यक्तीने या अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यानं कचराकुंडीत बघितलं असता त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला.

हेही वाचा..शिवसेना खासदार संजय जाधव यांना मारण्याचा कट, दिली होती 2 कोटींची सुपारी

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात अर्भक जीवाचा आकांत करत हंबरडा फोडत होतं. निर्दयी मातेनं या नवजात स्त्री जातीचं अर्भक फेकून दिलं होतं. अर्भकावर एकही कपडा नव्हता. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे मुलीची नाळ ठेचून तोडण्यात आल्यामुळे होणाऱ्या वेदनांनी पहाटेच्या थंडीत अर्भक अक्षरशः विव्हळत असल्याचं नितीन सुर्यवंशी यांनी बघितलं. ही बाब त्यांनी तत्काळ स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना कळवून मुलीला सुरक्षितरीत्या पोलिसांच्या स्वाधीन केलं.

सध्या या चिमुकलीवर पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती ठणठणीत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नढे आणि कुणाल साठे यांनी मुलीच्या उपचारसाठीचा सर्व खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशांत नढे आणि कुणाल साठे यांनी केली असून वाकड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

4 महिन्यांच्या बाळाला रस्त्याकडेला सोडले

दरम्यान, पुण्यातील चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अज्ञात व्यक्तींकडून 4 महिन्यांचे स्त्री जातीचे बाळ सोडून दिल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या बाळाला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून बाळाच्या आई-वडिलांचा शोध सुरू आहे. एका झाडाखाली कापडामध्ये गुंडाळून ते सोडून दिलं होतं.

चांदणी चौकातील उतारावरील भागातून नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. पोलिस त्या ठिकाणी गेले, त्यावेळी कापडात बांधून टाकून दिलेले अवघ्या पाच महिन्याचे बाळ पावसात भिजताना दिसले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला उचलून घेतले. त्या इवलुश्या गोडुलीच्या स्मितहास्याने पोलिसही क्षणभर गहिवरले.

हेही वाचा..विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीनं दिली धमकी, घाबरून तरुणीची आत्महत्या

कपडयात बांधलेले बाळ पावसातच कोणीतरी सोडून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. दोघांनीही बाळाला उचलून घेत आपल्या कवटाळले. त्यावेळी ते भुकेने व्याकूळ झाल्याचे पाहुन पोलिसांनी लगेचच त्याच्यासाठी दुधाची व्यवस्था केली.

स्थानिक कोथरुड चे नगरसेवक किरण दगड़े पाटिल यांनी सुद्धा तिथे तत्काळ येऊन पुढील तपासासाठी पोलिसांना सहकार्य केलं होतं

Published by: Sandip Parolekar
First published: October 28, 2020, 10:43 AM IST

ताज्या बातम्या