'आईला जीव लाव, मी देवा घरी चाललो', असं मुलीला सांगत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

'आईला जीव लाव, मी देवा घरी चाललो', असं मुलीला सांगत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

माझ्यावरील कर्जाचा वाढता डोंगर मला जगण्यास असमर्थ करीत आहे, कर्जबाजारीपणामुळे जगण्याचा कंटाळा आला...

  • Share this:

जालना,5 मार्च: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातीस महाविकास आघाडी सरकराने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या दोन याद्या जाहीर केली आहेत. मात्र, कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने जालना जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले आहे. भोकरदन तालुक्यातील वरुड (बु ) येथे ही घटना घडली आहे. गजानन पुंजाजी वाघ (वय-36) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव असून त्याने गळफास लावून आत्महत्या केली. गजानन वाघ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शाळेत जाणाऱ्या मुलीच्या नावे एक चिठ्ठी लिहिली आहे.

हेही वाचा..Alert! मुंबईतील कोरोना व्हायरसची 'ही' बातमी आहे अफवा

'माझ्यावरील कर्जाचा वाढता डोंगर मला जगण्यास असमर्थ करीत आहे, कर्जबाजारीपणामुळे जगण्याचा कंटाळा आला, तुमच्या गरजा, आईचे स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही. यामुळे मी पूर्णपणे खचलो आहे, आता आईला जीव लाव मी देवा घरी चाललो', असे शाळेत जाणाऱ्या लेकीला सांगितले. तर आई, पत्नीला मी नंतर शेतात येतो, असं सांगून मुलगी शाळेत गेल्यानंतर घराचा आतून दरवाजा बंद करून कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली. आवाज देऊनही कोणी दार उघडत नसल्यामुळे आजी व मुलगी घराजवळ आले. त्यांनी घराचा कडीकोंयडा तोडला, घरात गजानन यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची ग्रामस्थांनी तत्काळ भोकरदन पोलिसांना माहिती दिली. पोलिस आल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

हेही वाचा...दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या स्थानावर, मंदीमुळे विकासदर घसरुन 5.7 टक्क्यांवर

गजानन वाघ हे अल्पभूधारक शेतकरी होते. ते पंधरा वर्षांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपलं होतं. त्यामुळे संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला असल्याने शेतीतून कुठलेच उत्पन्न हाती लागले नाही. गजानन वाघ यांच्यावर महिंद्रा फायनान्स कपंनीचे दीड लाख रुपयांच तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एक लाख कर्ज होतं. गजानन वाघ याचे कर्ज माफीच्या यादीत नाव न आल्याने ते दोन दिवसांपासून अस्वस्थ होते. कर्ज फेडायचं कसं या विवेचनेतून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात नवं वळण, तब्बल 7 वर्षांनंतर समोर आला सगळ्यात मोठा पुरावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2020 01:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading