मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात नवं वळण, तब्बल 7 वर्षांनंतर समोर आला सगळ्यात मोठा पुरावा

दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात नवं वळण, तब्बल 7 वर्षांनंतर समोर आला सगळ्यात मोठा पुरावा

CBI ने पिस्तूल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलं आलं आहे. हे पिस्तूल खरंच दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलं होतं का याचा तपास सध्या सुरू आहे.

CBI ने पिस्तूल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलं आलं आहे. हे पिस्तूल खरंच दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलं होतं का याचा तपास सध्या सुरू आहे.

CBI ने पिस्तूल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलं आलं आहे. हे पिस्तूल खरंच दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलं होतं का याचा तपास सध्या सुरू आहे.

ठाणे, 05 मार्च :  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) हाती मोठा पुरावा लागला आहे. नॉर्वेच्या समुद्री एक्सपर्ट आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ठाण्याजवळच्या खारेगाव क्रीकमध्ये एक पिस्तूल सापडलं आहे. दाभोलकर यांना याच पुस्तूलाने ठार मारण्यात आल्याचं मानलं जातं आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. दाभोलकर यांना ऑगस्ट 2013 मध्ये मॉर्निंग वॉकला जाताना दोन अज्ञात बंदूकधारकांनी गोळ्या घालून ठार केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार,  CBI ने पिस्तूल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलं आलं आहे. हे पिस्तूल खरंच दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलं होतं का याचा तपास सध्या सुरू आहे. ऑगस्ट 2019 मध्ये एजन्सीनं पुणे कोर्टाला माहिती दिली की, ठाण्याजवळील खारेगाव इथं नदीतून शस्त्रं शोधणं आवश्यक आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून सीबीआयनं 7 जणांची नावं दिली होती.

नाव न सांगण्याच्या अटीवर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'बरेच दिवसांनंतर या पिस्तूलाचा शोध लागला आहे. बॅलिस्टिक तज्ज्ञ आता दाभोलकर यांच्या शवविच्छेदन रिपोर्टमध्ये आलेल्या बुलेटचा आकार आणि प्रकारानुसार याची तपासणी करतील. दुबईस्थित एन्व्हिटेक मरीन कन्सल्टंट्सने ही पिस्तूल शोधत होते. यासाठी कंपनीने नॉर्वेमधून मशिन्स आणल्या होत्या. या मशिन्स भारतात आणण्यासाठी 95 लाखांचे आयातशुल्क माफ केला असल्याचंही सांगण्यात येत आहे.

हे वाचा - महाभयंकर कोरोनाची देशभरात भीती, संक्रमणापासून वाचण्यासाठी करा हे उपाय

लोहचुंबकाच्या मदतीने हे पिस्तूल शोधण्यात आलं आहे. पिस्तूल शोधण्यासाठी आला 7.5 कोटी रुपये खर्च आला. इतकंच नाही तर 7 विविध पद्धतींचा वापर करून हे पिस्तूल शोधण्यात आलं आहे.

दाभोलकर प्रकरणातील बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हटलं आहे की, 'या क्षणी कोर्टासमोर हजर नसलेल्या तपासाच्या त्या पैलूंबद्दल मला बोलायचे नाही. परंतु जर प्रत्यक्षात असं घडलं असेल, तर मला वाटते की त्यांनी एप्रिलमध्ये किंवा पुढील 10 दिवसांत खटला सुरू करावा. डायव्हर्स कोठून आले आणि ही प्रक्रिया कशी झाली हे मला व्यक्तिशः माहित नाही. शोध अनेक वर्षे टिकला हे मनोरंजक आहे. तो समुद्र नाही फक्त एक छोटी नदी आहे. हे सर्व इतक्या लांब का गेले हे मला समजत नाही. '

हे वाचा - ‘हिंदूंवर मुस्लीम भारी पडतील’ असं वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाण यांना पुन्हा एकदा

माहितीनुसार, दाभोलकर प्रकरणाची सुनावणी घेणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी वैयक्तिक कारणं सांगून मागील महिन्यात राजीनामा दिला. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी कमी करण्याचे अनेक आदेश दिले होते. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर दाभोळकर यांना दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केलं. 2014 मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. प्रथम आरोपपत्र 6 सप्टेंबर 2016 रोजी दाखल केलं गेलं होतं. मुख्य सूत्रधार म्हणून वीरेंद्र तावडे आणि हल्लेखोर म्हणून सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचं नाव समोर आलं.

हे वाचा - साखरपुडा झाला अन् अंगाला लागली हळद, लग्नाच्या आधीच हुंडा घेऊन नवरदेव पळाला

13 फेब्रुवारी 2019 रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं, त्यामध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर अशी दोन हल्लेखोरांची नावं आहेत. 20 नोव्हेंबर 2019 रोजी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि त्याचे सहकारी विक्रम भावे यांच्याविरूद्ध आणखी एक आरोपपत्र दाखल करण्यात आलं. हत्येप्रकरणी त्याचे सह-सूत्रधार म्हणून नाव होतं. आरोपपत्रात ज्यांची नावं लिहिली गेली होती, त्यापैकी तावडे, कळसकर, अंदुरे आणि भावे हे तुरूंगात आहेत. अकोलकर आणि पवार यांना अटक केलेली नाही. 25 मे 2019 रोजी पुनाळेकर आणि भावेला अटक करण्यात आली. पुनाळेकरला 5 जुलै 2019 रोजी जामीन मंजूर झाला.

First published:

Tags: Dabholkar muder case, Dabholkar murder, Narendra dabholkar