मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा, आशिष शेलारांची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका

विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा, आशिष शेलारांची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका

मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढंच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर, प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच करण्यात आला

मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढंच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर, प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच करण्यात आला

मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढंच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर, प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच करण्यात आला

    मुंबई, 18 डिसेंबर: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं (metro car shed kanjurmarg) काम थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High court) दिले आहेत. त्यानंतर आता मेट्रो कारशेड बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमधल्या (BKC) बुलेट ट्रेनच्या जागेवर स्थानांतरित करण्याची चाचपणी ठाकरे सरकारने सुरु केली आहे. याबाबत आता महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. हेही वाचा...आपला पगार किती, आपण बोलता किती, भाजपच्या आमदारांचा संजय राऊतांना टोमणा आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले, मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढंच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर, प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच करण्यात आला, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये, असा डाव महाविकास आघाडी सरकारकडून आखला जात असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला जात आहे. हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधकच आहेत, अशी जहरी टीका देखील आशिष शेलार यांनी केली आहे. दुसरीकडे, विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्य सरकारचे सल्लागार कोण आहे, हे समजत नाही. जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. हेही वाचा...मजूर घेऊन जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात, मॉर्निग वाक करणाऱ्याचा चेंदामेंदा बुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी सरकार बीकेसीची जागा घेत आहे. बीकेसीची जागा ही प्राईस लँड आहे. त्यामुळं 25 हेक्टर जागेसाठी तो खर्च 25 ते 30 हजार कोटी रुपयांचा खर्च लागेल. तसेच जमिनीखाली डेपो करत असल्याने पाचशे कोटी रुपयांचं काम 5 हजार कोटींवर नेलं जात आहे. त्यामुळं सरकारचं राज्यातील सर्व प्रोजेक्ट बंद करायला निघाली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. संजय राऊत यांनी न्याय व्यवस्थेवर केलेल्या आरोपावर फडणवीस यांनी टीका केली. सरकारनं चुकीचं काम करायचं आणि न्यायालयानं चूक दाखविल्यावर न्यायव्यवस्थे दोष द्यायचा, हे न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ते नागपुरात बोलत होते.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Ashish shelar, Shiv sena, Udhav thackeray

    पुढील बातम्या