मुंबई, 05 जुलै : नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी जोरदार भाषण केले यामध्ये शेतकरी आत्महत्या (farmer suicide) मुक्त राज्य करणार असल्याची घोषणा केली. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे शेतकरी आत्महत्यामुक्त राज्याची घोषणा करत असतानाच दुसरीकडे अगदी 11 तास अगोदर तावरजखेडा (ता. उस्मानाबाद) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मारलेली पावसाने दडीने आणि दुबार पेरणीच्या (double sowing) संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. संजय शामराव फेरे (वय 46) यांना एक हेक्टर 16 गुंठे जमीन आहे. यामध्ये त्यांनी घरगुती बियाणे (seeds) घेऊन 29 जूनला सोयाबीनची पेरणी केली होती.
परंतु, पेरणी केलेले सोयाबीन उगवले नाही म्हणून फेरे यांनी सोमवारी पहाटे पाचला शेतातच गळफास घेतला. फेरे यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून 85 हजार कर्ज व ऊसतोडीपोटी मिळालेली रक्कम घेऊन शेती केली होती.
हे ही वाचा : आता डाव फडणवीसांच्या हातात, रोहित पवारांना शह देण्यासाठी राम शिंदेंना मंत्रिपद?
मशागत, पेरणीसाठी त्यांनी मोठा खर्च केला. परंतु, पाऊस लांबल्यामुळे पेरलेले उगवलेच नाही. यामुळे ते वैफल्यग्रस्त अवस्थेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दिव्यांग मुलगी, शाळकरी मुलगा असा परिवार आहे. दुर्दैव म्हणजे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सोमवारी दुपारी चारला शेतकरी आत्महत्यामुक्त राज्य निर्माण करण्याचा संकल्प केला. मात्र, 11 तास अगोदरच अशी घटना घडली.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज ठाणे शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर चेक नाका येथे जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे शक्तीस्थळ आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे भेट देऊन आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण केली. सर्वसामान्य, शोषित, वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी शक्तीस्थळाला भेट दिल्यानंतर दिली.
हे ही वाचा : CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर, पावासाच्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासनाला दिले आदेश
सर्वसामान्य घटकांचा, शोषित,वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आमचं सरकार करेल, राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.