Home /News /maharashtra /

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर, पावासाच्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासनाला दिले आदेश

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर, पावासाच्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासनाला दिले आदेश

हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार (imd alert heavy rain fall) पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती (flood situation) निर्माण होण्याची शक्यता आहे.

  मुंबई, 05 जुलै : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार (imd alert heavy rain fall) पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती (flood situation) निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath shinde) हे स्वतः कोकणातील (Konkan heavy rain fall) सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या (Konkan division all collectors advice cm eknath shinde) संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना (NDRF) तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी सकाळी लवकर जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

  विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना देण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. 

  हे ही वाचा : Weather Update : पावसाच्या धास्तीने प्रसाशन सज्ज, राज्यात पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा alert

  कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

  याचबरोबर उपमुख्यमंत्री यांनीही सूचना दिल्या आहेत. रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रायगड जिल्हाधिकार्‍यांची चर्चा करून संपूर्ण स्थितीची माहिती घेतली आणि योग्य ते दिशानिर्देश दिले असल्याची ते म्हणाले.

  हे ही वाचा : Kolhapur Rain : धबधब्यात अंघोळीला गेले अन् 80 जण अडकले, कोल्हापूर जिल्ह्यात घडली थरारक घटना

  महाडमध्ये 9, पोलादपूरमध्ये 13, माणगावमध्ये 1 अशी 23 गावांमधील सुमारे 1535 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुदैवाने सावित्री नदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही आणि ओहोटीमुळे एक मीटरने पाण्याची पातळी कमी होईल, अशी माहिती असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Monsoon, Raigad, Raigad news, Rain flood, Weather forecast, Weather update

  पुढील बातम्या