मुंबई, 16 जुलै: राज्यात (Maharashtra news) लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय-89) यांचा कोरोना रिपोर्ट यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना पुढील उपचारासाठी निलंगा (जि. लातूर) येथून पुण्यात हलवण्यात आलं आहे. याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
हेही वाचा...विमा कंपनीचं भिजत घोंगडं, बीडमध्ये मुंडे बहीण-भावात श्रेयवादाचं राजकारण सुरू
शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना गेल्या तीन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होतं. त्यांच्या कोरोनाची लक्षणं जाणवत होती. त्यामुळे त्यांनी तपासणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. निलंगेकर पाटील यांच्यावर निलंगा येथे उपचार करण्यात आले. आता पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यात सगळ्यात आधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आता हे नेते कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा...70 लाख शेतकऱ्यांना छोटी चूक पडली महागात!मिळाले नाहीत मोदी सरकारच्या योजनेचे पैसेअशोक चव्हाण यांनी केली कोरोनावर मात...
याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अशोक चव्हाण यांना उपचारासाठी नांदेडवरुन मुंबईला हलवण्यात आलं होतं. उपचार घेतल्यानंतर काही दिवसांतच अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर त्यांना 4 जूनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.