बीड, 16 जुलै: बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला विमा कवच देणाऱ्या इन्श्युरन्स कंपनीच्या नियुक्तीचा गोंधळ थांबायचं नाव घेत नाही आहे. नियुक्त केलेल्या कंपनीकडून अद्याप विमा प्रीमियम भरून घेतलेले नाही. यातच पीक विमा कंपनीच्या नियुक्तीवरून बीड जिल्ह्यात श्रेय वादाचे राजकारण चांगलेच रंगलं आहे.
हेही वाचा.. मोठा निर्णय! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्याबाबत गाईडलाईन जारी
बीडचो पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे आता आमने-सामने आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून उभय नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत.
दुसरीकडे, भारतीय जनात पक्षाने नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. कार्यकारणीत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करणाऱ्यांना महत्त्वाचे स्थान नसेल हे पक्षाने स्पष्ट केल्याचं बोललं जात आहे. या यादीवर पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असल्याचंही यादीवर नजर टाकल्यावर स्पष्ट होतं आहे.
'महाराष्ट्र भाजपच्या संपूर्ण टीमचं माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार,' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सध्या तरी आपल्या नव्या भूमिकेबाबत विस्ताराने बोलणं टाळलं होतं. मात्र, त्याचवेळी बहीण प्रितम मुंडे यांचं त्यांनी नव्या जबाबदारीबाबत अभिनंदन केलं आहे. 'प्रीतम ताईला शुभाशीर्वाद प्रदेशाचे उपाध्यक्ष मिळाल्याबद्दल अभिनंदन... मुंडे- महाजनाच्या संघटनेतील कामाचा वारसा चोख बाजावशील असा पूर्ण विश्वास. Good luck,' असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं होतं.
भाजपमध्ये पुन्हा फडणवीसांचाच वरचष्मा, स्पर्धकांचा पत्ता कट?
एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना भाजपने कार्यकारणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान दिलंय खरं, पण हे स्थान म्हणजे राज्यातलं केंद्रासारखं हे राज्यातले मार्गदर्शक मंडळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी मिळणार असं म्हणत राज्यात त्यांना स्थान नसणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पंकजा यांची बहिण प्रीतम मुंडे यांना उपाध्यक्ष पद देऊन मुंडे कुटुंबियांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. तर एकनाथ खडसे यांच्या सून आणि खासदार रक्षा खडसे यांना चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा...अभिनेत्री रिया चक्रवर्तीला बलात्कार आणि खुनाची धमकी, शेअर केला स्क्रीनशॉट
आता एकनाथ खडसेंना बाजूला करतानाच त्यांच्याच घरात संधी देत असल्याचंही पक्षानं दाखवून दिलं आहे. आता यानंतर खडसे नेहमीप्रमाणे टीकेचे आसूड ओढवणार की आहे ती परिस्थिती मान्य करणार हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.