भिवंडी, 20 जून: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाला रोखण्यात महानगरपालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचा आरोप होत असताना अखेर महानगरपालिका आयुक्तांची डॉ. प्रवीण आष्टीकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
हेही वाचा...अहमदनगर ऑनर किलिंगनं हादरलं? विहिरीत आढळला 12 वीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह
कोरोनावरून महानगरपालिका प्रशासनविरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य शासनाने महानगरपालिका आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी नियुक्त करावा, अशी जोरदार मागणी केली होती. त्याची राज्य शासनाने दखल घेतली आहे.
विद्यमान महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांची शनिवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागेवर नाशिक उपजिल्हाधिकरी तथा कळवण येथील प्रकल्प अधिकारी डॉ. पंकज आसिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. पंकज आसिया हे 2016 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकारी आहेत. डॉ.आसिया यांनी शनिवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयातील दालनात येवून आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
हेही वाचा... मटका व्यावसायिकाचा मुलगा बनला नायब तहसीलदार, मृत वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!
डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळात झालेले आर्थिक निर्णय वादग्रस्त ठरल्याबाबत तसेच कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येला आळा घालण्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपाचे आमदार रईस शेख़ , शिवसेना आमदार शांताराम मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष भगवान टावरे आदींनी निवेदन दिलं होतं. राज्य शासनाने भिवंडी महानगरपालिकेवर आयुक्त म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याने भिवंडीकर नागरिकांनी या नियुक्तीचे जोरदार स्वागत केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.