अहमदनगर, 20 जून: जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे एका विहिरीत 12 वीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुक्ता वारे अशी मृत विद्यार्थिनीची ओळख पटली आहे. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. सदर घटना ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच तरुणीने आत्महत्या केली असावी, या दृष्टीनंही पोलिस तपास सुरू आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा… पोलिस दलात खळबळ! कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबलची हनुवटीत गोळी झाडून आत्महत्या मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील मुक्ता वारे ही विद्यार्थिनी गुरूवारी दुपारी बेपत्ता झाली होती. शुक्रवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार तिचे आजोबा शहाजी यादव यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिली होती. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बेपत्ता तरूणीचा मृतदेह डोणगाव शिवारातील अशोक यादव या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत आढळून आला. जामखेड पोलिस स्टेशनला मुलीचे वडील संभाजी वारे यांनी सांगितले. मृत मुक्ता वारे ही विद्यार्थिनी लहान पणापासून डोणगाव या आपल्या आजोळी राहण्यास होती. तिने यावर्षी 12 वीची परीक्षा दिली होती. तिचे मूळगाव जामखेड तालुक्यातील रत्नापूर आहे. हेही वाचा… प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावानं आधी बहिणीच्या पतीवर केले सपासप वार मग… विहिरीतून मृत विद्यार्थिनीचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जामखेडच्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदर विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अधिक वेगाने जामखेड पोलिस करत आहेत. या प्रकरणात डोणगाव अरणगाव परिसरातून एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.