मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'बाजी प्रभू यांना गमवल्यानंतर राजांना काय वाटले..'; भूषणची अजिंक्य देवसाठी खास पोस्ट

'बाजी प्रभू यांना गमवल्यानंतर राजांना काय वाटले..'; भूषणची अजिंक्य देवसाठी खास पोस्ट

अभिनेता भूषण प्रधान सोशल मिडियावर नेहमी सक्रीय असतो. भूषण सध्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 16 नोव्हेंबर- मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान (bhushan pradhan)  सोशल मिडियावर नेहमी सक्रीय असतो. भूषण सध्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अजिंक्य देव ( ajinkya dev ) बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. पण आता अजिंक्य देव या मालिकेचा निरोप घेणार आहे. एका मालिकेत काम करताना सेटवर कलाकारांचे एकमेंकासोबत खास बॉन्डींग झालेले असते. अशातच एकादा कलाकार मालिकेचा निरोप घेणार असाल तर सेटवरचं वातावरण काहीसं भावनिक होतं. भूषणने देखील खास पोस्ट करत अजिंक्य देवविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

अंजिक्य देवसोबतचा फोटो शेअर करत भूषणने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘पावनखिंड इतक्यात नको… पुढे जाईल तर बरे… गेले अनेक आठवडे असेच वाटत होते. पण अखेर तो दिवस आला.. आमचे बाजी जाणार! प्रोमोशूट चा दिवस आठवतो. नुकताच typhoid च्या तापातनं उठून शूट ला गेलो. छत्रपति शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे ह्यांचा प्रोमो. त्या दिवशी Ajiknya Deo ह्यांना भेटलो…

वाचा : 'ना रुकेंगे, ना थमेंगे..' गांजाबद्दलच्या बातमीवरचं क्रांती रेडकरचं Tweet चर्चेत

पहिलीच भेट! संभाषणाला सुरूवात झाली तीच जणू अनेक वर्षांपासूनची ओळख असल्यासारखी. Sir - अजिंक्यजी, असे काही पर्याय न देता भेटताक्षणी तो अजिंक्य दादा झाला! प्रोमो शूट संपले… आणि न बोलताच एकमेकांना सांगून गेलो की एकमेकांना सांभाळत, एकमेकांवर विश्वास ठेवत आपला हा प्रवास सुखकर होणार! अजिंक्य दादा सेटवर आला की एक वेगळीच ऊर्जा सेटवर असायची.

एरवी खूप बोलणारा मी लॉकडाउन नंतर जरा कमी बोलायला लागलोय (कदाचित). पण दादा आणि मी सेट वर असलो आणि वेळ मिळाला की बोलावेसे वाटायचे, शेअर करावेसे वटायचे. एक उत्तम श्रोता (listener) … शांत आणि खरा स्वभाव, हसतमुख आणि अतिशय ग्राउंडेड. Fit & fine and a thorough gentleman.आयुष्यात अनेक संकटांना सामोरा गेला असणार तरी चेहरा हासतमुख, कसलाच माज किंवा गर्व नाही… आणि अनुभवी असूनही प्रचंड मेहनती! 5 महिन्यांचा त्याचा हा मलिकेतील प्रवास मला खूप काही शिकवून गेला आणि मी एक मित्र, एक मोठा भाऊ कमावला.

वाचा : 'आता पद्म पुरस्कार येणार..', स्वरा भास्करचा विक्रम गोखलेंवर निशाणा

‘5 महिन्यांनंतर अजिंक्य दादाचा मालिकेतील प्रवास संपणार’ हया विचाराने हळवा होत असताना, एक विचार मनात सारखा येतोय.. ‘घोडखिंडीत (पावनखिंडीत) बाजी प्रभू देशपांडे ह्यांना गमवल्यानंतर राजांना काय वाटले असेल’! छत्रपति शिवाजी महाराजांनी, स्वराज्य स्थापनेचा प्रवास चालू ठेवला असावा ते दुःख गिळून… पण ओलावा जपून!अजिंक्य दादा, लवकरच भेटू… नवीन भूमिकेत आणि आपापल्या भूमिकेतही!

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials