माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण आणखी तापणार? शिवसैनिकांची सशर्त जामिनावर सुटका

माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण आणखी तापणार? शिवसैनिकांची सशर्त जामिनावर सुटका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें याच्या संदर्भात आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअॅप फॉरवर्ड केल्यावरुन माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरें याच्या संदर्भात आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअॅप फॉरवर्ड केल्यावरुन माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. त्यात या प्रकरणी पुन्हा अटक करण्यात आलेल्या 6 शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा...सर्वात मोठ्या खाजगी बँकेचे ग्राहकांसाठी खास गिफ्ट, कर्जावरील EMI झाला कमी

मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा भादंवि कलम 452 नुसार पुन्हा एकदा सर्वा आरोपींना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आलं. प्रत्येकी 15-15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपींची सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशीसाठी बोलवण्यास हजर राहावे, असे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

याआधी 12 सप्टेंबरला या प्रकरणी एकूण सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांची लगेच त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

पोलिसांनी रिमांड मागितलाच नाही...

मुंबई पोलिसांनी सहा आरोपींना दुसऱ्यांदा सोमवारी रात्री उशीरा अटक केली. सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आले. मात्र, मुंबई पोलिसांकडून संबंधित आरोपींचा रिमांड कोर्टाकडे मागितलाच नाही. त्यामुळे कोर्टानं सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावली. नंतर सर्व आरोपींनी कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज केला असता त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा...

दरम्यान, शिवसैनिकांनी मारहाण केलेले निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मंगळवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काही माजी लष्करी अधिकारी आणि भाजपचे नेते अतुल भातखळकर आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. या प्रकरणी शिवसेनेनं माफी मागावी, हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर अपहरणाची कलमं लावण्यात यावी, अशा मागण्यात करण्यात आली. तसेच मदन शर्मा यांनी तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशीही मागणी राज्यपालांकडे केली आहे.

हेही वाचा...निवृत्तीनंतर Axis Bank मध्ये जमा केले तब्बल 40 लाख रुपये, अचानक खातं झालं रिकामी

आरोपींमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुखाचा समावेश...

दरम्यान, निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांना अटक केली. यामध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश आहे.  कांदिवली पश्चिम येथे ही मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज शुक्रवारी व्हायरल झालं होतं. यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनवेर टीका करत कारवाईची मागणी केली. यानंतर या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांनी हल्ल्यासाठी जबाबदार आरोपींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. ज्यानंतर काही तासातच हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असणारे कमलेश कदम आणि संजय मांजरे यांना अटक करण्यात आली होती. मात्र या सगळ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: September 15, 2020, 4:14 PM IST

ताज्या बातम्या