निवृत्तीनंतर Axis Bank मध्ये जमा केले तब्बल 40 लाख रुपये, अचानक खातं झालं रिकामी

निवृत्तीनंतर Axis Bank मध्ये जमा केले तब्बल 40 लाख रुपये, अचानक खातं झालं रिकामी

निवृत्तीनंतर पुढील आयुष्य चांगलं जावं, यासाठी सुरक्षित ठिकाणं म्हणून बँकेत पैसे जमा करुन ठेवले जातात. मात्र येथूनही हे पैसे गहाळ झाले तर...

  • Share this:

सासाराम. नॅशनल अॅल्यूमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मधील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या खात्यातून लाख रुपये गायब झाल्याची घटना समोर आली आहे. सेवानिवृत्तीनंतर पुढील आयुष्य चांगलं जावं, यासाठी सुरक्षित ठिकाणं म्हणून बँकेत पैसे जमा करुन ठेवले जातात. मात्र येथूनही हे पैसे गहाळ झाले तर...

या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या बँकेतून तब्बल 40 लाख रुपये गायब झाले आहेत. या संदर्भात अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सांगितले जात आहे की सासाराममधील एक्सिस बँकेतून (Axis Bank of Sasaram) प्रकाश चंद्र अखौरी यांच्या खात्यातून मोठी रक्कम गायब झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सेवानिवृत्तीनंतर पाटण्यातील आपला फ्लॅट विकला. ज्यातून मिळालेली 40 लाखांची रक्कम त्यांनी एक्सिक बँकेत जमा केली. एक्सिक बँकेत 20-20 लाखांचे दोन इंटरेस्ट सर्टिफिकेटअंतर्गत इतकी मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन महिन्यात व्याज मिळत नसल्याने त्यांना शंका आली. जेव्हा त्यांनी बँकेत जाऊन खात्याची चौकशी केली तेव्हा त्यांच्या खात्यातील रक्कम गायब झाल्याची माहिती समोर आली.

पोलिसात केली तक्रार

सांगितले जात आहे की 21 जुलै 2020 पासून 28 जुलैदरम्यान विविध पद्धतीने त्यांच्या खात्यातील सर्व रक्कम काढून घेण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी अशा प्रकारचा गुन्हा केल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्याने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रकाश चंद्र अखौरी यांच्या जीवनभरातील कमाई सायबर गुन्हेगारांनी गायब केली आहे.

हे ही वाचा-VIDEO : चोर हॉटेलमध्ये शिरला, पोटभर जेवला.. मात्र गल्ल्याला हातही लावला नाही

याबाबत एक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक अमित कुमार यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. बँकेटी टेकनिकल टीम संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत. लवकरच तपासात या खुलासा होईल, असे सांगितले जात आहे. दुसरीकड़े आपल्या आयुष्यातील जमा निधी गेल्याने निवृत्त अधिकारी त्रस्त झाले आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: September 15, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या