मुंबई, 19 मार्च : एकीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे सर्वसामांन्यांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे आता सरकारी अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे एक अजब मागणी केली आहे. लाचखोर म्हणून पकडलं तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांची ओळख गुप्त ठेवा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य राजपात्रित अधिकाऱ्यांनी आपल्या या मागणीचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांची ही अजब मागणी चर्चेचा विषय ठरली आहे.
काय आहे अधिकाऱ्यांची मागणी?
लाचखोर म्हणून पकडलं तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांची ओळख गुप्त ठेवा, अशी अजब मागणी महाराष्ट्र राज्य राजपात्रित अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांनी आपल्या मागणीचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. आता या पत्रावर सरकार काय निर्णय घेणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यात पुन्हा सत्ताबदल? बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य
ओळख गुप्त ठेवा
अँटिकरप्शन कारवाईत पकडल्या गेलेल्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांचं नाव आणी छायाचित्र प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करावा. लाचखोरीच्या अनेक प्रकरणात पकडलेले अधिकारी न्यायालयात निर्दोष सुटतात. मात्र तोपर्यंत त्यांच्या नावाची बदनामी होते. संबंधित अधिकाऱ्याची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कोर्टात दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याची ओळख गुप्त ठेवावी अशी मागणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. आता यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde