136 जणांचे पथक पहाटेच धडकलं जळगावात, 'या' पतसंस्थेसह अवसायकांच्या घरी छापा

136 जणांचे पथक पहाटेच धडकलं जळगावात, 'या' पतसंस्थेसह अवसायकांच्या घरी छापा

‘बीएचआर’च्या कोट्यावधींच्या मालमत्तेची कवडीमोल दराने खरेदी करणारे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर

  • Share this:

जळगाव, 27 नोव्हेंबर: जळगाव शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR)मल्टी-स्टेट कॉ ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीवर आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) अधिकाऱ्यांनी धाड टाकली. आर्थिक फसवणूक तसेच पाच वर्षांपासून अवसायकाच्या नेमणुकीच्या काळात झालेला अपहारासह ‘बीएचआर’च्या कोट्यावधींच्या मालमत्तेची कवडीमोल दराने खरेदी करणारे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनासाठी 136 जणांचे पथक शुक्रवारी सकाळी 7 जळगावात धडकलं.

हेही वाचा...महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, बंडखोर नेत्याची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी

सकाळी सात वाजता अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या शिवाजी नगरातील घरी पथक धडकलं. उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी तेथे घरझडती घेतली. तसेच संस्थेच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात देखील पथक दाखल झाले. येथे 45 जणांच्या पथकाने चौकशीचे सूत्र हाती घेतले. त्याशिवाय उद्योजक सुनील झंवर, पतसंस्था ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे आदींच्या निवासस्थानी देखील तपासणीसह झाडाझडती सुरु आहे.

'बीएचआर'च्या अपहार प्रकरणी राज्यभरात चेअरमनसह गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानतंर या संस्थेवर पाच वर्षांपासून अवसायकाची नेमणूक करण्यात आली आहे. या काळात झालेल्या गैरव्यवहाराच्या तक्रारीवरुन आज शुक्रवारी पूणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवसयकासह, कर्जदार, ठेवीदार संघटनाचे पदाधिकारी व संस्थेच्या जागा लिलावात घेणाऱ्या उद्योजकांकडे छापे टाकले.

हेही वाचा...आजी-आजोबांसमोरच 10 वर्षांच्या नातवाचा बिबट्यानं घेतला जीव

बीएचआरमधील फसवणूक तसेच अपहाराशी संबंधितांकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून चौकशी सुरु आहे. त्यात प्रामुख्याने बीएचआर संस्थेत झालेला अपहार, गुंतवणूकदारांची थकीत ठेवी न देणे, त्याशिवाय संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल दराने झालेली विक्री याची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाल्याचे समजते.

Published by: Sandip Parolekar
First published: November 27, 2020, 4:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading