मुंबई, 27 नोव्हेंबर: विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi Government) अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP)हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी चंद्रशेखर भोयर (Chandrashekhar Bhoyar)यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांनी दिली आहे,
हेही वाचा...महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दुफळी? बाळासाहेब थोरातांनी टोचले अशोक चव्हाणांचे कान
अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या महा विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
अमरावतीत चौरंगी लढत..?
कोरोना काळात महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिक्षण संघर्ष समितीचे वतीने नेहमी चर्चेत असलेल्या संगीता शिंदे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अमरावती विभागात विद्यमान आमदार श्रीकांत देशमुख, नितीन धांडे, शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून 1 डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघातील विद्यमान शिवसेना-भाजप युतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना भाजपाचे संभाव्य उमेदवार नितीन धांडे यांच्याकडून तगडे आव्हान मिळणार आहे.
दुसरीकडे, वाढीव वीज बिलाचा मुद्दा आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणेवरून राज्यात रान पेटलं आहे. याच मुद्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात सरकारला घेरलं आहे. अशातचं महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्तीच्या दिवशी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे.
हेही वाचा..धक्कादायक! आजी-आजोबांसमोरच 10 वर्षांच्या नातवाचा बिबट्यानं घेतला जीव
नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना जरा घाईच केली. त्यांनी घोषणा करण्याआधी पक्षात आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसं केलं नाही, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांचे कान टोचले आहे.