मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! आजी-आजोबांसमोरच 10 वर्षांच्या नातवाचा बिबट्यानं घेतला जीव

धक्कादायक! आजी-आजोबांसमोरच 10 वर्षांच्या नातवाचा बिबट्यानं घेतला जीव

या हल्ल्यामुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

या हल्ल्यामुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

या हल्ल्यामुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

बीड, 27 नोव्हेंबर: शेतात गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास आष्टी तालुक्यातील किन्ही येथे उघडकीस आली. चार दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात वाघदरा शिवारात एका शेतकऱ्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना उघडकीस आली.

स्वराज सुनील भापकर असं मृत मुलाचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे आजी-आजोबांसमोरच स्वराजचा बिबट्यानं जीव घेतला. या घटनेमुळे आष्टीसह पाटोदा, शिरूर तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. वनविभागानं बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा...मुलांसोबत लोकलने प्रवास करण्यास महिलांना मनाई, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मिळालेली माहिती अशी की, किन्ही गावातील स्वराज सुनील भापकर हा शुक्रवारी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास आजी-आजोबांसोबत शेतात गेला होता. मात्र, झुंडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून स्वराजला उचलून नेले. त्याच्या आजी-आजोबांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर इतर गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. त्यानंतर वन विभागाचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं. पथक आणि गावकऱ्यांनी स्वराजचा शोध घेतला असता झाडाझुडपात त्याचा मृतदेह आढळून आला.

तालुक्यात चार दिवसात बिबट्यानं दुसरा बळी घेतल्याने मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. नरभक्षक बिबट्या खुलेआम तालुक्यात फिरत असताना वनविभाग काहीच करत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या वाक्यात स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या आहेत.

तुरीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने घेतला जीव

दरम्यान, चार दिवसांपूर्वी तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या बीडमधील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नागनाथ गहिनिनाथ गर्जे (40 ) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या हल्ल्यामुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गहिनिनाथ गर्जे हे गावाजवळच्या वाघदरा या शेतात तुरीला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी देत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारपासून गेलेले गर्जॅ सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शेतात पाहणी केली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा...आंदोलनापूर्वीच महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांना राजधानी दिल्लीत केलं स्थानबद्ध

मयत हे आष्टी पंचायत समितीच्या मोराळा गनाच्या पंचायत समिती सदस्या आशा गर्जे यांचे पती होत. आष्टी तालुक्यात बिबाट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होत असून वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

First published:

Tags: Beed, Maharashtra, Marathwada