मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कामाची पाहणी करत असताना 8 व्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, भिवंडीतील घटना

कामाची पाहणी करत असताना 8 व्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, भिवंडीतील घटना

भिवंडीत उच्चभ्रू अंबिका सिटीच्या हलगर्जीपणामुळे आठव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

भिवंडी, 21 नोव्हेंबर : भिवंडी तालुक्यातील बोरपाडा परिसरात अंबिका सिटी (Ambika City Bhiwandi) तयार करण्यात येत असून इमारत उभारण्याच काम सुरू आहे. मात्र आज काम सुरू असताना इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन साईड अभियंता (Engineer dies) खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आमीन मोहम्मद मुस्‍तकीम अन्सारी (वय 27) असं मयत साईड अभियंताचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील बोरपाडा परिसरात मुंबईतील सुप्रसिद्ध बिल्डर अनुप करनानी यांच्या वतीने उच्चभ्रू अंबिका सिटी सोसायटी बनवण्यात येत आहे. या अंबिका सिटीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिल्म अभिनेता संजय कपूर यांची उपस्थिती देखील पहायला मिळाली होती. मागील 5 वर्षांपासून या ठिकाणी इमारत तयार करण्याचे काम सुरू आहे.

Shocking Video! स्मोकिंग करताना चेहराच पेटला; ऐटीत धूर सोडण्याची हौस पडली महागात

याच प्रोजेक्टमध्ये अभियंता मोहम्मद आमीन मोहम्मद मुस्‍तकीम अन्सारी हा आज दुपारच्या सुमारास इमारतीच्या आठव्या मजल्यावर पाहणी करत असताना तोल जाऊन  खाली पडल्याने  जागीच मृत्यू झाला.

WhatsApp कडून यूजर्सना मिळणार Surprise; App मध्ये होणार मोठे बदल; जाणून घ्या

मयताच्या वडिलांनी विकासकावर हलगर्जीपणाचा आरोप लावला असून याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची काळजी न घेण्यात आल्यामुळे ही दुर्घटना घडली, असल्याचा आरोप  केला आहे. त्यामुळे दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसंच जोपर्यंत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेतली जात नाही तोपर्यंत हे काम बंद करावे अन्यथा इतरांचेही जीव जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत.

First published: