मुंबई 18 ऑगस्ट : महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला आता आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. पुढील काळात वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या सहा महिन्यात महावितरणच्या वीज खरेदी खर्चात 13 टक्के वाढ झाल्याने राज्यात वीजदरात वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल आणि मे महिन्यात वीज खरेदी खर्च 27 टक्क्यांपर्यंत वाढला होता. एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 दरम्यान महावितरणाला वीज खरेदीसाठी 30 हजार 746 कोटी रुपयाची मान्यता वीज नियामक आयोगाने दिली होती. मात्र प्रत्यक्षात कंपनीला 34 हजार 806 कोटी रुपयांचा वीज खरेदी खर्च आला आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांवर वीजदर वाढीची टांगती तलवार आहे. सर्वसामान्यांना आणखी एक झटका! राज्यात दुधाच्या दरात पुन्हा वाढ, किती रुपयांनी महागलं दूध? याआधी जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट 25 पैशांची दरवाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वीजदरात वाढ होणार असल्याचं समोर येत आहे. महावितरणाच्या ग्राहकांवर या महागाईचा परिणाम होणार आहे. कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्याने इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. Farmer Rain Damage : शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार, जुन्या पद्धतीनेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार दूर दरवाढीमुळेही सर्वसामान्यांना झटका - दरम्यान आता राज्यभरात दूधाच्या दरामध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली गेली आहे. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. डिझेल, पॅकिंगचा कच्चा माल आणि विजेच्या दरवाढीमुळे दुधाचे दर वाढवल्याचं समोर येत आहे. त्यामुळे एकंदरीतच या सर्व दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.