मराठी बातम्या /बातम्या /agriculture /Farmer Rain Damage : शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार, जुन्या पद्धतीनेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार

Farmer Rain Damage : शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार, जुन्या पद्धतीनेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार

पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान सरकारने राज्यातील नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्याना मागच्या तुलनेत यंदा ज्यादा नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान सरकारने राज्यातील नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्याना मागच्या तुलनेत यंदा ज्यादा नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान सरकारने राज्यातील नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्याना मागच्या तुलनेत यंदा ज्यादा नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

मुंबई, 18 ऑगस्ट : मागच्या दोन महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान सरकारने राज्यातील नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्याना मागच्या तुलनेत यंदा ज्यादा नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. (Farmer Rain Damage) यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. परंतु जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने राज्य आपत्ती व्यवस्थापनातील जुन्याच तरतुदीने मदत निधीची मागणी केली आहे.

राज्य सरकारने वाढीव मदत जाहीर केली असली तरी मदत मात्र जुन्याच तरतुदीने मिळणार असल्याचे यामुळे स्पष्ट होऊ लागले आहे. दरम्यान, प्रशासनाने अतिवृष्टीने बाधित क्षेत्रफळासाठी 204 कोटी 42 लाख, तर खरडून गेल्याने व गाळ साचल्याने खराब झालेल्या जमिनीच्या नुकसानभरपाईसाठी 9 कोटी 4 लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

हे ही वाचा : Maharashtra Rain : मुंबई, पुण्यात पावसाचा येलो अलर्ट तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

जुलै महिन्यात 5, 10, 18, 19, 24,26 असे सहा दिवस अतिवृष्टी झाली होती. ही अतिवृष्टी अमरावती, तिवसा, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोशी, वरुड, दर्यापूर, अंजनागवसुर्जी, चांदूरबाजार, धारणी व चिखलदरा या तालुक्यांना फटका बसला. त्यामुळे शेती व फळपिकांचे नुकसान झाले. एकूण 2 लाख 41 हजार 164 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. बाधित क्षेत्राच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने 13 मे 2015 च्या शासन निर्णयामधील निकषानुसार 204 कोटी 42 लाख अनुदान मागणीचे प्रस्ताव पाठविले आहेत. 

अमरावती, भातकुली, तिवसा, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगावखंडेश्वर, मोर्शी, दर्यापूर, अंजनगावसुर्जी, चांदूरबाजार, धारणी व चिखलदरा या अकरा तालुक्यांतील 881.5 हेक्टर जमीन खरडून गेली. या बाधित शेतकऱ्यांना 3 कोटी 5 लाख 6 हजार 50 रुपयांची, तर शेतात तीन इंच गाळ साचल्याने खराब झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईपोटी 5 कोटी 74 लाख 32 हजार 110 रुपयांची मागणी केली आहे. सरकारने तीन हेक्टरच्या मर्यादित प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपये मदतीची घोषणा केली.

हे ही वाचा : सिंचन घोटाळ्याचं भूत पुन्हा बाटलीबाहेर, अजितदादांना अजूनही क्लीन चीट नाही!

वाढीव मदत मिळण्याची शक्यता धूसर

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती व्यवस्थापनातील मदतीच्या निकषांत बदल करून वाढीव मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रशासनाकडून कोरडवाहू शेतीच्या नुकसानीच्या मदतीसाठी हेक्टरी 6 हजार 800 रुपयांप्रमाणेच मागणी नोंदविण्यात आली आहे. तर बागायतीसाठी 13 हजार 500 व फळबागांसाठी 18 हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जुलैमधील बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नव्या घोषणेनुसार वाढीव मदत मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे जाणकारांचे मत आहे.

First published:
top videos

    Tags: Agriculture, Farmer protest, Protesting farmers, Rain fall, Rain flood