मुंबई 18 ऑगस्ट : दिवसेंदिवस महागाईच्या कचाट्यात अडकत असलेल्या सर्वसामान्यांना आता आणखी एक झटका बसणार आहे. आता राज्यभरात दूधाच्या दरामध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली गेली आहे. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शिर्डी साई मंदिरात फुल-हार नेण्यास बंदी, निर्णयाला विरोध करत दुकानदारांचे अनोखे आंदोलन डिझेल, पॅकिंगचा कच्चा माल आणि विजेच्या दरवाढीमुळे दुधाचे दर वाढवल्याचं समोर येत आहे. म्हैस आणि गाईच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटरला सरसकट दोन रुपये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आणखी आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्यभरात दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय खाजगी सहकारी दूध संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 30 जुलै रोजी गोकुळने दुधाचे दर वाढवले होते. गोकुळने दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली होती. यानंतर गोकुळचं दूध विक घेण्यासाठी मुंबईत लिटरला आता 66 रुपये मोजावे लागत होते. यानंतर राज्यभरातील दूधाचे दर वाढणार हे निश्चित होतं. त्याप्रमाणेच आता दूधसंघाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. दरम्यान दूध खरेदी दारातही वाढ केल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. बारामतीतील अवघ्या 8 महिन्यांच्या बाळाने अचानक दूध पिणं सोडलं; मेडिकल रिपोर्ट पाहून पालक हादरले राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघाची राज्यस्तरीय संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची तातडीची बैठक बुधवारी रात्री झूमवरून घेण्यात आली होती. या बैठकीला राज्यातील सुमारे 30 दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी दूध दरवाढीबाबतची माहिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.