मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेना-मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने, कल्याण लोकसभेतील ग्रामीण भागात सरपंचपदाच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं?

शिवसेना-मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने, कल्याण लोकसभेतील ग्रामीण भागात सरपंचपदाच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं?

सरपंचपदाची निवडणूक असल्याने सकाळपासूनच पोलिसांमुळे परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.

सरपंचपदाची निवडणूक असल्याने सकाळपासूनच पोलिसांमुळे परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.

सरपंचपदाची निवडणूक असल्याने सकाळपासूनच पोलिसांमुळे परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.

डोंबिवली, 8 फेब्रुवारी : कल्याण लोकसभेतील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाबाबत शिवसेना, भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. वडवली शिरढोणमध्ये शिवसेनेने आपला भगवा फडकवला आहे, तर काकोळेमध्ये मनसेने पहिल्यांदाच सरपंच पद मिळविलं आहे. तसंच खरड ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी यांनी युती करीत भाजपला धूळ चारली आहे.

नेवाळी आणि मल्लंगवाडी येथे भाजपचे सदस्य जास्त निवडून आल्याने भाजपला सरपंच पद मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र सरपंच पदाची निवडणूक गाजली ती फक्त खोणी वडवली ग्रुप ग्रामपंचायतीमुळे. या ठिकाणी मतदानाच्या दिवशी सुद्धा गोंधळ झाला होता. तसंच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा सुद्धा त्यावेळी दिसून आला. आज सरपंच पदाची निवडणूक असल्याने सकाळपासूनच पोलिसांमुळे परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.

शिवसेना-मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने

खोणी वडवली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे 5, मनसेचे 3, भाजपचे 2 तर राष्ट्रवादीचा 1 सदस्य निवडून आल्याने सरपंच पदाकरीता सेना मनसेमध्ये चुरस लागली. यातच आज दिलेल्या वेळेमध्ये शिवसेनेचे 5 सदस्य सोडले तर इतर कोणीही सदस्य अर्ज भरण्याकरता आले नाहीत. दुपारी 2.30 च्या सुमारास मनसेचे सदस्य ग्रामपंचायत कार्यालयावर दाखल झाले. परंतु वेळ संपल्यामुळे सदस्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली.

यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. सेनेचेही कार्यकर्ते यावेळी पुढे आल्याने वातावरण काही वेळेसाठी तणावपूर्ण झाले. पोलिसांनी त्वरीत जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदस्यांना घेऊन तेथून काढता पाय घेतला. परंतु यामुळे सेनेच्या गटात काहीशी खळबळ माजली आणि वातावरण गरम झाले. यावेळी ठाण्यातीलही काही शिलेदार ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने आले होते. परंतु निवडणूक विस्तार अधिकारी सुधीर बोंबे यांनी गणपूर्तता नसल्याने तसेच वेळ संपल्याने सरपंच पदाची निवडणूक उद्या होईल असे जाहीर केल्याने शिवसेना कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे ही सरपंच पदाची निवडणूक आता उद्यावर ढकलली गेली आहे.

हेही वाचा - काँग्रेसला धक्का, कार्यकर्त्यांसह माजी आमदाराने नाना पटोले यांच्याकडे पाठवला राजीनामा

दुसरीकडे डोंबिवलीत शिवसेनेने मनसेचे पदाधिकारी फोडल्यामुळे मनसेने सरपंच निवडणुकीसाठी सदस्य उशीरा पाठवित शिवसेनेला तंगत ठेवले आहे. येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवली आणि परिसरात सेना आणि मनसेमध्ये चांगलीच लढत रंगेल असे दिसून येते. खोणी वडवलीमध्ये शिवसेनेतर्फे वंदना ठोंबरे आणि मनसेतर्फे जयश्री ठोंबरे यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरला आहे. काकोळे ग्रामपंचायतीमध्ये मनसेच्या रेश्मा गायकर या सरपंच पदी तर नरेश गायकर यांची उपसरपंच पदी निवड झाली.

वडवली शिरढोणमध्ये शिवसेनेच्या अरुणा पाटील यांची सरपंचपदी, केशव पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. तर खरड ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या संतोष भगत आणि राष्ट्रवादीचे धर्मा गायकर यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे. येणाऱ्या 10 तारखेला मांगरुळ, नेवाळी, हाजीमलंग वाडी, नाणेर, बुद्रुल आणि उसाटणे याठिकाणची सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. उसाटणेच्या सरपंचपदी कोण बसणार, याची चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली आहे.

First published:

Tags: Election, Gram panchayat, Kalyan, Shivsena