Home /News /maharashtra /

VIDEO: चार्टर्ड प्लेनने आलाता का? फोटोंबद्दल विचारल्यावर नितीन देशमुखांनी काय उत्तर दिलं पाहा..

VIDEO: चार्टर्ड प्लेनने आलाता का? फोटोंबद्दल विचारल्यावर नितीन देशमुखांनी काय उत्तर दिलं पाहा..

महाराजांनी जशी गनिमीकाव्याने आग्र्याहून सुटका करून घेतली, तशी आपणही सुरतेहून गनिमीकावा साधत पळून आलो, असा दावा करणाऱ्या आणि थरारक सुटकेची कहाणी सांगणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना चार्टर्ड प्लेनच्या त्या फोटोंविषयी विचारल्यावर ते काय म्हणाले पाहा VIDEO

पुढे वाचा ...
  hiमुंबई, 23 जून: नितीन देशमुखांनी आपली सुरतेहून कशी थरारक सुटका करून घ्यावी लागली, कसाबसा जीव वाचवून कसा परत आलो असं सांगत एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर खळबळजनक आरोप करणारे आमदार नितीन देशमुख यांची प्रेस कॉन्फरन्स पुरी व्हायच्या आत काही फोटो समोर आले. शिंदे गटानेच ते फोटो व्हायरल केले. त्यामध्ये नितीन देशमुख हसतमुखाने चार्डर्ड प्लेनपाशी उभे असलेले दिसत आहेत. शिंदे यांनी देशमुखांचे आरोप खोटे असल्याचं सांगत हे फोटो पुरावा म्हणून सादर केले आहेत. देशमुखांची परत जायची इच्छा होती म्हणून त्यांना चार्टर्ड प्लेनने सुखरूप मुंबईत सोडण्यात आलं, असा दावा शिंदे गटाने केला आहे. नितीन देशमुख काय म्हणाले होते? वर्षा बंगल्याबाहेर खासदार संजय राऊत यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन नितीन देशमुख यांनी कथित 'आपबीती' सांगितली. 'मला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर 20 ते 25 जणांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले गेले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो, पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे", असं देशमुख म्हणाले. हे वाचा - 'आता गाडी खूप पुढे गेली आहे'; संजय राऊतांच्या 'परत या' आवाहानानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

  या त्यांच्या अनुभवकथनानंतरही पत्रकारांच्या प्रश्नांना थेट उत्तरं देण्याचं देशमुखांनी टाळलं. खासदार राऊत यांनीच पत्रकार परिषदेचा ताबा घेत प्रश्न टोलवले. या पत्रकार परिषदेनंतर लगेचच शिंदे गटाकडून चार्टर्ड फ्लाइटचे फोटो पुढे आणण्यात आले. यामध्ये देशमुख हसतमुखाने या प्लेनपाशी फोटो घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून देशमुखांचे सगळे आरोप खोटे असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या प्रतिनिधीने हे फोटो कसे असं विचारण्यासाठी देशमुख यांना पुन्हा गाठलं तेव्हा नितीन देशमुख मूळ प्रश्न टाळून कसे निघून गेले पाहा VIDEO आग्र्याहून सुटका करून घेतली, असं सांगत ते पोलिसांच्या गराड्यात निघून गेले. फोटोंचं काय हा प्रश्न तसाच राहिला.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Maharashtra politics, Shiv sena

  पुढील बातम्या