जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Eknath Shinde and Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र, वेळ आणि तारीखही ठरली, पण...

Eknath Shinde and Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र, वेळ आणि तारीखही ठरली, पण...

Eknath Shinde and Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र, वेळ आणि तारीखही ठरली, पण...

शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे एकदाही एकत्र आलेले नाहीत. ते एकत्र येण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 जानेवारी : मागच्या सहा महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाले यामध्ये शिवसेनेतील 40 आमदार फुटल्याने महाविकास आघाडीला पायउतार होऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान सत्तांतर झाल्यानंतर युतीने सत्तास्थापन करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे एकदाही एकत्र आलेले नाहीत. ते एकत्र येण्याची शक्यता आहे.

जाहिरात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 23जानेवारी रोजी एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण या दिवशी होणार आहे.

हे ही वाचा :  अनेक राज्यपाल पाहिले पण असा राज्यपाल..; शरद पवारांचा पुन्हा कोश्यारींवर हल्लाबोल

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात ठाकरे काही वेळ विधान परिषदेत उपस्थित होते. मात्र, त्यावेळी शिंदे आणि फडणवीस हे दोघेही सभागृहात नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते प्रथमच एकत्र येतील. ठाकरे यांना या कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, विख्यात गायिका आशा भोसले यांना देखील कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, ठाकरे या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे अनावरण होणार असल्याने ते हे निमंत्रण स्वीकारतील, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे  गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याचं मान्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला आधीच खूप उशिर झाला आहे.  

जाहिरात

हे ही वाचा :      ‘साहेब माफ करा महापालिका टक्केवारी’..; बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळील बॅनर चर्चेत

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी मागणी शिंदे गटाचे बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. संजय गायकवाड यांच्या या मागणीनंतर शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तारावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात