मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अनेक राज्यपाल पाहिले पण असा राज्यपाल..; शरद पवारांचा पुन्हा कोश्यारींवर हल्लाबोल

अनेक राज्यपाल पाहिले पण असा राज्यपाल..; शरद पवारांचा पुन्हा कोश्यारींवर हल्लाबोल

शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी सीमावादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी सीमावादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी सीमावादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारला टोला लगावतानाच सल्ला देखील दिला आहे. ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांनी जमिनीवर पाय ठेऊन राहायचं असतं. मात्र काही लोक हे टोकाची भूमिका घेत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी शरद पवार यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेत दोन गट पडले हे खरं आहे. मात्र कडवा शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच आहे. निवडणुका येतील तेव्हा जनतेचा भावना काय आहे हे कळेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे.   ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांनी जमिनीवर पाय ठेऊन राहायचं असतं. मात्र काही लोक हे टोकाची भूमिका घेत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी पवार यांनी  शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेत दोन गट पडले हे खरं आहे. मात्र कडवा शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान महाविकास आघाडी एकत्रित पाऊले टाकत असून, आणखी काही गटांना सोबत घेण्याची चर्चा सुरू असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सीमावादावर प्रतिक्रिया

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सीमावादाची केस कोर्टात सुरू आहे. या पूर्वी देखील सीमा प्रश्नावर दोन बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही बैठक घेऊन आपली बाजू नीट मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणात हरिश साळवे यांना वकील म्हणून नेमण्याबाबत सर्वांचं एकमत झालं आहे. अंतिम निर्णय आल्यास समाधानाची गोष्ट असेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  '...तर मी राजकारणात आलो नसतो', सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले

राज्यपालांवर प्रतिक्रीया

यावेळी शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.  अनेक राज्यपाल या राज्यात पाहिले आहेत, त्यांनी राज्याच्या हिताचे मार्गदर्शन केले.  मात्र हे राज्यपाल सतत वादग्रस्त व्यक्तव्य करतात. त्या पदाची प्रतिष्ठा कोश्यारी यांच्याकडून राखली जात नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Sharad Pawar