जळगाव; 28 नोव्हेंबर : पुन्हा एकदा भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे हे आमने-सामने आले आहेत. नोट बंदीच्या काळात तुम्ही काय केलं? हे सर्वांना माहिती आहे. मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला. मात्र त्यानंतर एकनाथ खडसे यांचा देखील पारा चांगलाच चढला. त्यांनी देखील गिरीश महाज यांचा एकेरी शद्बात उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला.
महाजन, खडसे आमने-सामने
पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे आमनेसामने आले आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ खडसेंनी नोटबंदीच्या काळात काय केलं? कुठे आणि कशा नोटा बदलल्या हे सर्व मला माहिती आहे. असा खळबळजनक आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच मला जास्त बोलायला लावू नका असा थेट इशाराही गिरीश महाजन यांनी खडसेंना दिला. गिरीश महाज यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंचा पारा चांगलाच चढला. त्यांनी थेट गिरीश महाज यांचा एकेही शद्बात उल्लेख केला आहे.
हेही वाचा: आता आमनेसामने, भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी; कोणाचा विजय होणार?
खडसेंनी काय म्हटलं?
गिरीश महाजन यांच्या नेटबंदीच्या वक्तव्यावर खडसे चांगलेच भडकले. त्यांनी महाजन यांचा एकेरी शद्बात उल्लेख केला. आतापर्यंत तुझी जबान चूप का राहिली , कोणाचा दबाव होता? काय शोधायचं ते शोधून काढा असा जोरदार पलटवार एकनाथ खडसे यांनी केला आहे. दरम्यान आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath khadse, Girish mahajan, Jalgaon, NCP