मुंबई, 25 जुलै: कोरोनामुळे देशात ऑनलाइन शिक्षण सुविधा विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी सुरू केली आहे. मात्र अनेक लहान गावं अथवा खेड्याच्या ठिकाणी नेटवर्क नसल्यानं किंवा अनेक समस्या असल्यानं ऑनलाइन शिक्षण सुविधेपासून विद्यार्थी वंचित राहात असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी छतावर बसून ऑनलाईन क्लास करत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखीन एक फोटो व्हायरल होत आहे.
शिकण्यासाठी जिद्दीनं धडपणाऱ्या एका मुलाचा फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. गावात रेंज येत नाही म्हणून हा युवक रोज डोंगर चढून जातो. या डोंगरावर जाऊन ऑनलाइन क्लास करतो आणि त्यानंतर पुन्हा डोंगर उतरून घरी जातो. हा त्याचा रोजचा दिनक्रम झाला आहे. गावात रेंज नसल्यामुळे ऑनलाइन क्लास अटेंड करणं शक्य होत नाहीत. हे क्लास चुकू नयेत म्हणून रोज युवकाला ही कसरत करावी लागत आहे.
हे वाचा-PHOTOS : मूर्ती लहान पण कीर्ती महान! धाडसासमोर ठेंगणी झाली आव्हानं
Ayoung boy called Harish from Barmer in Rajasthan climbs a mountain every day in order to get internet access so that he can attend online classes. He climbs at 8 am and returns home at 2pm after the class ends. Admire his dedication and would want to help him. pic.twitter.com/iZ8WlBBgSP
— Virender Sehwag (@virendersehwag) July 24, 2020
U can help him but there are many students like him who don't get proper education because of government negligence.
Better u should question the gov which is unable to provide even basic things to the people of the country...
Raise ur voice against the government
— ALI (@Itrwalaladka) July 24, 2020
ही घटना आहे राजस्थानच्या बाडमेर इथली. भारताचे माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांनी हा या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याची व्यथा मांडली आहे. या मुलाचे कठोर परिश्रम पाहून मदत करण्याचं आवाहन ही सेहवाग यांनी केलं आहे.
हे वाचा-आईच्या निधनाचं दु:ख उराशी असतानाही मुलीनं फेडलं बापाचं कर्ज
वीरेंद्र सेहवाग यांच्या हा पोस्टला 75 हजारहून अधिक लाईक्स आणि 7 हजार हून अधिक रिट्वीट आणि कमेंट्स आल्या आहेत. याआधी गावात रेंज नाही म्हणून लॉक़डाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून एका शिक्षकानं झाडावरून आपला क्लास सुरू केला होता. हे शिक्षक झाडावर दिवसभर क्लास घेत असत आणि संध्याकाळी पुन्हा घरी जायचे. अनेक भागांमध्ये आजही नेटवर्क किंवा आर्थिक विवंचना असल्यानं ऑनलाइन शिक्षण सुविधेपासून वंचित आहेत.