औरंगाबादेत शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, परीक्षेबाबत दिली महत्त्वपूर्ण माहिती

औरंगाबादेत शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, परीक्षेबाबत दिली महत्त्वपूर्ण माहिती

पोलिसांनी आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. ऑनलाइन परीक्षेतील संभ्रम, ग्रामीण विद्यार्थ्यांची अडचण

  • Share this:

औरंगाबाद, 19 सप्टेंबर: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) शनिवारी औरंगाबादेत आहेत. विद्यार्थ्यांनी मनात संभ्रम ठेवू नये. 1 लाख 92 हजार विद्यार्थी ऑनलाईन तर 11 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. पदवी प्रमाणपत्रावर कोविड-19 (Covid 19) असा कोणताही शेरा लागणार नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, 1 ऑक्टोबरला परीक्षा झाल्यास 10 तारखेला निकाल जाहीर केला जाईल. तात्काळ निकाल देण्यासाठी यंत्रणा उभारणीचं काम सुरू आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तशी चर्चाही झाल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा...दोन मुलं आणि पत्नीसह सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या, धक्कादायक आहे कारण

शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न...

दरम्यान, शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ताफा विद्यापीठात अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यापीठ परिसरात प्रवेश करताच विद्यापीठ विभाजनाचा आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्त्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. ऑनलाइन परीक्षेतील संभ्रम, ग्रामीण विद्यार्थ्यांची अडचण, आणि विद्यापीठाचे विभाजन यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. संतप्त आंदोलकांनी राज्य सरकार आणि शिक्षणमंत्र्याविरुद्ध जोरदार घोषणबाजी केली.

शिक्षणमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे....

-1 लाख 92 हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार

-11 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार

-निकालावर कोणताही शेरा लागणार नाही

-1 ऑक्टोबरला परीक्षा झाल्यास 10 तारखेला निकाल

-विद्यार्थ्यांनी मनात संभ्रम ठेवू नये

-तात्काळ निकाल देण्यासाठी यंत्रणा उभारणीचं काम सुरू

दरम्यान, कोरोनामुळे (coronavirus) यंदा विद्यार्थ्यांची मोठी समस्या  झाली आहे. त्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे विद्यार्थी अजूनही संभ्रमावस्थेत आहे. पदवीच्या परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रमाणपत्रावर कोविड-19 (Covid-19) असा उल्लेख नसणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

पदवी प्रमाणपत्रात कोविड-19 चा उल्लेखाबाबत जो चुकीचा संदेश देईल त्यावर पोलीस कारवाई करणार असल्याचा इशारा उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे.

उदय सामंत यांनी सांगितलं की, 50 मार्कंची परीक्षा होईल. 90 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. मागील वर्षांचे मार्क्स गृहीत धरण्यात येणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांची डिसेंबरमध्ये त्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

उदय सामंत यांना धमकीचा फोन...

उदय सामंत हे गेल्या आठवड्यात अमरावती दौऱ्यावर होते. त्याच्या पीएला एका विद्यार्थी संघटनेने धमकीचा फोन आला होता. अमरावती बाहेर निघून दाखवा, अशी फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकाराबाबत उदय सामंत यांनी पोलिसांना फोन करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

उदय सामंत यांना एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून भेटण्याची वेळ मागितली होती. सामंत त्यांना भेटणार होते. याच संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून उदय सामंत यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट केल्याचे समोर आलं आहेय. त्यानंतर पोलिसांनी त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना न भेटण्याचे उदय सामंत यांना सांगितले. त्यानंतर त्याच कार्यकर्त्याकडून उदय सामंत यांच्या पीएला फोन करून अमरावती बाहेर निघून दाखवा, अशी फोनद्वारे धमकी देण्यात आली.

हेही वाचा...काँग्रेसमधील ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, केली महत्त्वाची मागणी

पोकळ धमक्यांना घाबरत नाही...

आपण अशा पोकळ धमक्यांना घाबरत नसून ज्या विद्यार्थी संघटनांनी आपल्याशी चर्चा करायला समोर यावे, असे आवाहन उदय सामंत सावंत यांनी केले. काही विद्यार्थी संघटना केवळ आपल्या राजकीय पक्षाला खुश करण्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप करत आहे. हे योग्य नसल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. काही सुधारणा असल्यास आम्ही त्याचा जरूर स्वीकार करू, असेही यावेळी उदय सावंत यांनी सांगितले.

Published by: Sandip Parolekar
First published: September 19, 2020, 12:41 PM IST

ताज्या बातम्या