काँग्रेसमधील ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, विदर्भासाठी केली महत्त्वाची मागणी

काँग्रेसमधील ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, विदर्भासाठी केली महत्त्वाची मागणी

'गेल्या वर्षी 6 दिवसांच्या अधिवेशनावर 13 कोटी खर्च झाला होता. तोच खर्च विदर्भातील मेडिकल यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी वापरावा.

  • Share this:

नागपूर, 19 सप्टेंबर : नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.   नागपूरमध्ये होणार हिवाळी अधिवेशन रद्द करून त्या अधिवेशनावर जो खर्च होतो तो खर्च नागपूरसह विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी खर्च करावा अशी मागणी केली आहे.

'गेल्या वर्षी 6 दिवसांच्या अधिवेशनावर 13 कोटी खर्च झाला होता. तोच खर्च विदर्भातील मेडिकल यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी वापरावा. नागपूरमध्ये ऑगस्टपेक्षा सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात मृत्यूच प्रमाण सुद्धा वाढत आहे. लोकांना बेड मिळत नाही आहे', असंही ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

तर दुसरीकडे महानगर पालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर आणि इतर स्टाफ मिळत नाही आहेत. नागपुरातील खाजगी रुग्णालयात 80 टक्के बेड राखीव ठेवायला सांगितले आहे. इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती सुधारण्यासाठी अधिवेशनावर होणारा खर्च ही सगळी परिस्थिती सुधारण्यासाठी वापरावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे.

नागपुरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू

दरम्यान, नागपुरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लोकप्रतिनिधींच्या मागणीवर शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे. आजपासून या जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे.

परंतु जनता कर्फ्यूबाबत प्रशासनातर्फे कुठलेही अधिकृत आदेश काढण्यात आले नसल्याचे, स्पष्ट केले आहे.

यावर महापौर म्हणाले, 'जनता कर्फ्यूवर राजकारण हे दुर्दैवी,जनतेनी जनतेच्या सुरक्षेसाठी दोन दिवस कमीकमी नियम पाळावे हाच जनता कर्फ्यू चा हेतू आहे', अशी प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी दिली.

Published by: sachin Salve
First published: September 19, 2020, 12:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या