सामूहिक आत्महत्या! दोन मुलं आणि पत्नीसह सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या, धक्कादायक आहे कारण

सामूहिक आत्महत्या! दोन मुलं आणि पत्नीसह सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या, धक्कादायक आहे कारण

आई-वडिल आणि दोन मुलांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. गळफास घेत सगळ्यांनी आपलं आयुष्य संपवलं.

  • Share this:

राजस्थान, 19 सप्टेंबर : कौटूंबिक आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथून खळबळजनक बातमी मिळाली आहे. एकाच कुटुंबातील 4 सदस्यांनी आत्महत्या केली आहे. आई-वडिल आणि दोन मुलांनी एकत्र आत्महत्या केली आहे. या घटनेमुळं संपूर्ण शहर हादरलं आहे. कर्जामुळे कुटुंबात ताण होता त्यामुळे त्यांनी जीवन संपवल्याची प्राथिमिक माहिती समोर येत आहे.

या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली आहे की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

सुशांतच्या मृत्यूवर बनणार सिनेमा, हे स्टार अभिनेते साकारणार महत्त्वाची भूमिका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिल आणि दोन मुलांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. गळफास घेत सगळ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांकडून पोलिसांना प्राचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घरात तपास सुरू केला आहे.

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पोलिसांनी घटनास्थळावरून 4 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हे कुटुंब सोन्याच्या व्यापारात असल्याचं सांगण्यात येत आहे. पण डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्यामुळे कुटुंबात नैराश्य होतं. कर्जामुळे घरावर मोठ्या अडचणी येत होत्या अशात कोणीतरी व्याज माफिया कुटुंबाला वारंवार त्रास देत होता. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी करत व्याज माफियाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 19, 2020, 12:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या