जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची सर्वात मोठी कारवाई, मुंबईतील घर जप्त

VIDEO : प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची सर्वात मोठी कारवाई, मुंबईतील घर जप्त

VIDEO : प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची सर्वात मोठी कारवाई, मुंबईतील घर जप्त

मुंबईतून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जुलै : मुंबईतून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील घरावर जप्तीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा खूप मोठा झटका आहे. प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून याआधी दोनवेळा चौकशी झाली आहे. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. दोनवेळा केलेल्या चौकशीनंतर ईडीने जो तपास केला त्यानंतर पटेल यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे, निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे. ईडीला ज्या पद्धतीने त्यांच्या संपत्तीच्या, मालमत्तीच्या व्यवहाराच्या नोदींविषयी अनियमितता आढळली होती. याचमुळे प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सीजी हाऊसमधील घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीसोबत झालेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

जाहिरात

ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची दोनवेळा चौकशी झाली होती. पण त्या चौकशीतून समाधनकारक माहिती मिळाली नव्हती. अंडरवर्ल्डचा डॉन इक्बाल मिर्ची याच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली होती. हवाई क्षेत्रातील एव्हीएशन डिलमध्ये दीपक सलवारचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. संशियत व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांना 6 जूनला सुद्धा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. याचमुळे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेले आर्थिक व्यवहार समोर आले होते. ( गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी ही बातमी वाचा; शिंदे-फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश ) वरळी येथील सीजे हाऊस ही एक मोठी इमारत आहे. याच इमारतीच्या बांधकामाआधी तिथे एक छोटीसी इमारत होती. ती इमारत गँगस्टार इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. ती इमारत प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने पुनर्विकासित केल्याची माहिती समोर आली होती. त्या इमारतीच्या जागेच्या मोबदल्यात पटेल यांच्या कंपनीकडून इक्बाल मिर्ची आणि त्याच्या नातेवाईकांना जागा आणि पैसे दिल्याची माहिती समोर आली होती. याच प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. ईडीकडून कागदपत्रांची छाननी केली गेली. अनेक दिवसांपासून तपास सुरु होता. अखेर या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची दोनवेळा चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांच्या सीजे हाऊसमधील घरावर जप्तीची कारवाई केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात