Home /News /maharashtra /

7 महिन्यापूर्वीच थाटला होता संसार अन् माथेरानला नेऊन पत्नीचे छाटले शीर!

7 महिन्यापूर्वीच थाटला होता संसार अन् माथेरानला नेऊन पत्नीचे छाटले शीर!

आरोपी पतीकडून पत्नीच्या मृतदेहाचे कापलेले शीर मिळवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न रायगड पोलीस करत आहे.

आरोपी पतीकडून पत्नीच्या मृतदेहाचे कापलेले शीर मिळवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न रायगड पोलीस करत आहे.

आरोपी पतीकडून पत्नीच्या मृतदेहाचे कापलेले शीर मिळवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न रायगड पोलीस करत आहे.

माथेरान, 13 डिसेंबर : माथेरानमध्ये (Matheran) एका खोलीत महिलेचा शीर नसलेला मृतदेह (dead body)आढळल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. पण एका चिठ्ठीमुळे या गुन्ह्याची उकल झाली असून या महिलेची ओळख पटली आहे. मुंबईतील राहणाऱ्या या महिलेची तिच्यात पतीने हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, 7 महिन्यापूर्वीच मृत महिलेचं लग्न झालं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनम पाल (poonam pal) असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला मुंबईतील गोरेगाव इथंर राहणार होती. हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शनिवारी 11 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी आणि तरुण हे माथेरान येथे फिरायला आले होते. त्यावेळेस, त्यांनी इंदिरानगर येथील एका घरातील खोलीमध्ये वास्तव्य करीत रुबिना बेन आणि अमजद खान, असं खोटं नाव सांगून अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचं नमुद केलं होतं. दरम्यान, रविवारी सकाळी त्यांच्या खोलीचे दार उघडं असल्यान साफ सफाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला खोलीतील दिवाणाखाली महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.  या घटनेची माहिती त्यानं पोलिसांना देताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पोलीसांनी पंचनामा केला. सकाळी घराबाहेर पडले तेव्हा होते रुग्णवाहिका चालक, दुपारपर्यंत झाले कोट्यवधी! त्यावेळी या मृतदेहाचं डोकं कापण्यात आल्याचं आढळून आलं होतं. यामुळे, पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवित महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं. तपासा दरम्यान, घटनास्थळा पासून काही फुटांच्या अंतरावर झुडपामध्ये एक बॅग आढळून आली होती.  त्यामध्ये दवाखान्याच्या एका चिठ्ठीवर मुंबईतील गोरेगाव येथील पत्ता आढळून आला होता. माथेरान येथील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाचा फोटोही मिळवण्यात पोलिसांना यश आले. यावरून, पोलिसांनी मुंबईतील गोरेगाव येथील पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली असता पुनम पाल ही महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचं निष्पन्न झालं. पुढील तपास केला असता पुनम पाल ही तरुणी नवऱ्याला भेटण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने तपास केला असता माथेरान येथे हत्या करण्यात आलेल्या तरुणीसोबत असलेला तरुण हा तिचा नवरा असल्याचं निष्पन्न झालं होतं. यावरून, पुनम पाल हिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता त्याला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. राहुल गांधीच्या मुंबईतल्या सभेला परवानगी नाही? काँग्रेसची हायकोर्टात धाव दरम्यान, सात महिन्यांपूर्वी मे 2021 मध्ये लग्न झालं होतं. पण, पुनम पाल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करण्यात आली असल्याची शक्यता पोलिसी सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी पतीकडून पत्नीच्या मृतदेहाचे कापलेले शीर मिळवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न रायगड पोलीस करत आहे. 'पुनम पाल हिच्या पतीच्या घरच्यांनी लग्नात साडे पाच लाख हुंडा घेऊन सुद्धा आणखी पैशाची मागणी सासरकडून चालली होती. तसंच भाऊजी, सासु, सासरे व नणंद हे या अगोदर दोन वेळा माथेरानमध्ये येऊन गेले होते. या सर्वांनी पुर्व तयारी करुनच आपल्या बहिणीचा खून केला, असा आरोप मृत पूनमचा भाऊ रमेश पाल याने केला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Dead body

पुढील बातम्या