Home /News /mumbai /

राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेसची थेट मुंबई हायकोर्टात धाव

राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेसची थेट मुंबई हायकोर्टात धाव

राहुल गांधी येत्या 28 डिसेंबरला मुंबईच्या शिवाजी पार्क येथे सभा घेणार आहेत. पण या सभेच्या परवानगीच्या विनंतीवर प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने थेट हायकोर्टात धाव घेतली आहे.

मुंबई, 13 डिसेंबर : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या (BMC Election 2o21) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकींच्या काँग्रेसचा शड्डू ठोकण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यावेळी स्वत: मुंबईत (Mumbai) येणार आहेत. राहुल गांधी येत्या 28 डिसेंबरला मुंबईत येणार असल्याची माहिती याआधीच समोर आली आहे. ते मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे 28 डिसेंबर हा काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे हा दिवस काँग्रेससाठी खूप विशेष असणार आहे. मुंबई काँग्रेसने या दिवशी शिवाजी पार्क येथे सभा घेता यावी म्हणून मुंबई महापालिकेला पत्र पाठवलं होतं. पण महापालिकेने नगरविकास विभागाकडे बोट दाखवलं आहे. अखेर प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने काँग्रेसने राहुल गांधींच्या सभेसाठी मुंबईत धाव घेतली आहे.

काँग्रेसने याचिकेत नेमकं काय म्हटलंय?

काँग्रेसने मुंबई महापालिकेकडे पत्राद्वारे याबाबत विनंती करण्यात आली होती. पण मुंबई महापालिकेने या पत्राला उत्तर देत नगरविकास विभागाकडे याचे अधिकार असल्याचं सांगितलं होतं. पण नगरविसाक विभागाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे मुंबई काँग्रेसने थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. काँग्रेसने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत 22 ते 28 डिसेंबर दरम्यान सभेसाठी परवानगी देण्यात यावी. 22 ते 27 डिसेंबरपर्यंत तयारी आणि 28 डिसेंबरला सभेसाठी परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे. हेही वाचा : ऐकावं ते नवलंच! प्लास्टिकच्या बाटल्यांपासून व्हॅनिला आइस्क्रीमचा फ्लेवर मिळणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची शिवाजी पार्कवर पहिलीच सभा

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात येत्या 28 डिसेंबरला पहिलीच सभा होणार आहे. याआधी 2018 साली काँग्रेसने राहुल गांधी यांना शिवाजी पार्क येथे सभा घेऊ द्यावी, अशी विनंती केली होती. पण त्या सभेची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर येत्या 28 डिसेंबरला राहुल गांधींची सभा होण्याची शक्यता आहे. तसेच याआधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात 2003 आणि 2006 साली काँग्रेसची मुंबईत सभा आयोजित करण्यात आली होती.

राहुल गांधींच्या सभेच्या दिवशी मुंबईत जमावबंदी लावणार का? ओेवेसींचा सवाल

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या चांदिवली येथे सभा घेतली होती. विशेष म्हणजे एमआयएमच्या या सभेला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही एमआयएमकडून सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे ही सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या सभेत भाषण करताना ओवेसी यांनी राहुल गांधी जेव्हा मुंबईत सभा घेण्यासाठी येतील तेव्हा त्यांना परवानगी देणार का? तेव्हा कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करणार का? असे प्रश्न विचारले होते.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या