जाहिरात
मराठी बातम्या / देश / सकाळी घराबाहेर पडले तेव्हा होते रुग्णवाहिका चालक, दुपारपर्यंत झाले कोट्यवधी!

सकाळी घराबाहेर पडले तेव्हा होते रुग्णवाहिका चालक, दुपारपर्यंत झाले कोट्यवधी!

सकाळी घराबाहेर पडले तेव्हा होते रुग्णवाहिका चालक, दुपारपर्यंत झाले कोट्यवधी!

सध्या या रुग्णवाहिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : पश्चिम बंगालमधील (West Bengal) एका रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला 1 कोटीचा (Crore) जॅकपॉट (Jackpot) लागला आहे. त्याने सकाळी 270 रुपयांचं एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. दुसरी झाली तेव्हा त्यालाही विश्वास बसला नाही की, तो कोट्यवधी झालेला आहे. लॉटरी जिंकलेल्या या विजेत्याची सध्या परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. पूर्वी वर्धमान (East Bardhaman) जिल्ह्यात राहणारे शेख हीरा (Sheikh Heera) व्यवसायाने रुग्णवाहिकेचे चालक आहेत. काल सकाळी उठल्यानंतर काही कामासाठी ते एका दुकानात गेले होते. तेथे त्यांनी 270 रुपयांच्या लॉटरीचं तिकीट खरेदी केलं.  (Lottery Ticket). यानंतर ते कामावर निघून गेले. दुपारी लॉटरीचा निकाल आला. जे तिकीट शेख हीराने खरेदी केलं होतं, त्या नंबरवर 1 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला आणि काही तासात ते कोट्यवधी झाले. यापूर्वीही शेख यांनी अनेकदा लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं, मात्र त्यांना कधीच लॉटरी लागली नाही. ते केवळ जॅकपॉट लागल्याचं स्वप्नच पाहत होते. हे ही वाचा- लाईव्ह बातम्या सांगतानाच अचानक पडला महिला अँकरचा दात अन्…; पाहा Shocking Video आधी आईवर उपचार मग घर.. शेख म्हणतात की, त्यांची आई गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आहे, तिच्यावर उपचार सुरू आहे. आर्थिक चणचण असल्यामुळे मी तिच्या उपचारासाठी फार खर्च करू शकत नव्हतो. आता इतके पैसे आल्यानंतर पहिल्यांदा आईवर उपचार करीन आणि त्यानंतर राहण्यासाठी चांगलं घर खरेदी करेन. सुरुवातील एक कोटींची लॉटरी लागल्यानंतर ते तिकीट हरवेल या भीतीने आधी पोलीस ठाण्यात गेले. यानंतर पोलिसांनी त्याला सुखरुप घरी पोहोचवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात