'सुशांतला न्याय हे नाटक होतं का?' बॉयफ्रेंडबरोबर रोमँटिक डान्स VIDEO शेअर केल्यानंतर अंकिता लोखंडे ट्रोल
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील सुशांतच्या मृत्यूनंतर न्यायाची मागणी (Justice for SSR) केली होती. पण सध्या तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे सुशांतचे चाहते तिच्यावर टीका करत आहेत.
मुंबई, 26 नोव्हेंबर: अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असते. तिच्या एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूनंतर देखील तिने काही पोस्ट केल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या होत्या. दरम्यान या पोस्टमुळे अभिनेत्रीला काही वेळा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. अलीकडेच अंकिताने तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनबरोबर (Vickay Jain) एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'बँग बँग...' या गाण्यावर दोघेजणं थिरकताना दिसत आहेत. मात्र अंकिताच्या आणि खासकरून सुशांतच्या चाहत्यांना हा व्हिडीओ काहीसा रुचला नाही आहे. अंकिता सुशांतला इतक्यात कशी काय विसरली असा सवाल चाहते सोशल मीडियावर करत आहेत.
अभिनेत्री अंकिता लोखंडेने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर एका चाहत्याने विचारलं आहे की, 'म्हणजे सुशांतसाठी न्याय हे सर्व नाटक होतं का?' तर आणखी एका युजरने अशी कमेंट केली आहे की, 'संपूर्ण देश सुशांत सिंह राजपूतच्या न्याय मिळवण्याबाबत काळजीत आहे आणि ज्या व्यक्ती सुशांतच्या जवळ होत्या ते डान्स करत आहेत.' काहींनी अशी टीका केली आहे की या लोकांना काही फरक पडत नाही केवळ सुशांतच्या मृत्यूचा त्यांनी फायदा घेतला. अंकिताकडून अशी अपेक्षा नव्हती अशीही कमेंट इन्स्टाग्राम युजर्सनी केली आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताने दिवाळी सेलिब्रेशनचे देखील फोटो पोस्ट केले होते, त्यावेळी देखील सुशांतच्या चाहत्यांनी अंकिता लोखंडे आणि तिच्या बॉयफ्रेंडला ट्रोल केलं होते.
अंकिता आण सुशांत सिंह राजपूत सहा वर्ष रिलेशनशीपमध्ये होते, ते लिव्ह इनमध्ये देखील राहत होते. मात्र काही कारणास्तवर त्यांचं ब्रेकअप झालं आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. जून 2020 मध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतला न्याय मिळावा याकरता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कॅम्पेन राबण्यात आलं होतं. अंकिता लोखंडे हिने देखील चाहत्यांची साथ देत सुशांतला न्याय देण्याची मागणी केली होती. पण आता तिने ही अशी पोस्ट केल्यानंतर अंकिलाबरोबरच तिच्या बॉयफ्रेंडला देखील ट्रोल केले जात आहे. अंकिता विकी जैनशी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.