बीड, 13 डिसेंबर : नवसाला पावणार्या रेणुका देवी मंदिराच्या ( Renuka devi Mandir Beed) दरावाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून आतील रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना बीड (beed) जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देवगांव येथे उघडकीस आली. यामुळे गावासह पंचक्रोशीत खळबळ उडाली असून भक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे. चोरट्यांना तात्काळ अटक करून देवीच्या दानपेटीतील दान परत आणा अशी मागणी भक्त मंडळीनी केली आहे. केज तालुक्यातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या देवगाव येथील नवसाला पावणाऱ्या श्री रेणुका देवीच्या दान पेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवीच्या मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी देखील फोडली आहे. या दानपेटीतील रोख रकमेसह दान दिलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू देखील लंपास केल्या आहेत. नवस फेडण्यासाठी दूरवरून लोक या ठिकाणी येतात आल्यानंतर बोललेला नवस पैशाच्या रूपाने किंवा दागिने रूपाने दानपेटी टाकतात त्यावर चोरट्यांनी लक्ष ठेवून देवीच्या दान पेटीला लक्ष केले आहे. लग्न झालं असताना देखील या अभिनेत्रीने सलमानला घातली लग्नाची मागणी आठ वर्षांपुर्वी याच मंदिरातील दान पेटी फोडण्यात आली होती. यात लाखो रुपयांची दानपेटीतील दान सोन्या चांदीचे दानातील वस्तू चोरीला गेल्या होत्या. यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक केली गेली नाही. तोच आज पुन्हा अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दान पेटी फोडून आतील रोख रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे व जमादार भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. EIL Recruitment: इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड इथे 2,20,000 रुपये पगाराची नोकरी बीड जिल्हा चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी नेकनूर परिसरात तीन ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. यात अटक केलेले आरोपी हे केज तालुक्यातीलच असल्याचे समोर आले होते. यामुळे पुन्हा एकदा मंदिराची दानपेटी फोडणारे चोरटे जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.