जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / काय म्हणायचं आता.. लग्न झालं असताना देखील या अभिनेत्रीने सलमानला घातली लग्नाची मागणी

काय म्हणायचं आता.. लग्न झालं असताना देखील या अभिनेत्रीने सलमानला घातली लग्नाची मागणी

काय म्हणायचं आता.. लग्न झालं असताना देखील या अभिनेत्रीने सलमानला घातली लग्नाची मागणी

बॉलिवूड स्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफने नुकतेच अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न बंधनात अडकली आहे. आता अशातच सलमान खान कधी लग्न करणार असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 डिसेंबर: बॉलिवूड स्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफने नुकतेच अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न बंधनात अडकली आहे. आता अशातच सलमान खान कधी लग्न करणार असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे. या सगळ्यात एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने **(Anita Hassanandani)**लग्न झाले असताना देखील सलमानला प्रपोज केले आहे. सध्याया अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता सलमान यावर काय प्रतिक्रिया देणार का हे देखील पाहावे लागणार आहे. अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी (Rohit Reddy) हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि परिपूर्ण जोडप्यांपैकी एक आहेत. 2013 मध्ये लग्न झाल्यापासून दोघेही लोकांना कपल गोल देत आहेत. या वर्षी अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी एका बाळाचे पालक झाले आहेत. ज्याचे नाव त्यांनी आरव ठेवले. अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि मजेदार व्हिडिओ देखील शेअर करतात. दोघांचे हे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात. वाचा :  राजकुमारी सारखीच दिसतेय ‘Vicky की दुल्हन’, कतरिनाने अशी केली लग्नमंडपात एंट्री नुकताच अनिता हसनंदानीने एका खास व्हिडिओद्वारे सलमान खानला (Salman Khan) लग्नासाठी प्रपोज केले आहे. यासाठी तिने पती रोहित रेड्डी याची माफी मागितली आहे. अनिता हसनंदानीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत 72 हजारांहून अधिक लोकांनी त्याला पाहिले आहे. या व्हिडिओमध्ये अनिता वारंवार ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे’ मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे म्हणताना दिसत आहे. वाचा:  पार्टीमुळे नाही, त्या व्यक्तीमुळे कोरोना झाला - करीनाने दिली पहिली प्रतिक्रिया अनिताने पुढे लिहिले आहे की, ‘सॉरी बेबी रोहित, मला या वर्षी एक रील प्रामाणिकपणे बनवायाची होती.’ अनिता हसनंदानीचा हा व्हिडिओ खरोखर मजेदार आहे. यामध्ये ती सलमान खानला प्रपोज करताना आणि त्याच्याशी लग्न करण्यास होकार देताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर सेलेब्सही जोरदार कमेंट करत आहेत. जर तुम्ही अनिता हसनंदानी किंवा तिचा पती रोहित रेड्डी यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर गेलात तर तुम्हाला दिसेल की दोघेही एकापेक्षा एक मजेदार व्हिडिओ बनवतात आणि शेअर करतात.

जाहिरात

अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांचीही चांगली फॅन फॉलोइंग आहे. अनिता हसनंदानी नागिन 4 आणि नागिन 5, ये है मोहब्बतेंसह अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. एकता कपूरनेही ‘नागिन 6’ची घोषणा केली आहे. अनिता ‘नागिन 6’ चा भाग असणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात