Dr. Sheetal Amte आत्महत्येचं गूढ कायम; टॅबचा password खुलेना

Dr. Sheetal Amte आत्महत्येचं गूढ कायम; टॅबचा password खुलेना

Dr. Sheetal Amate Suicide Case: शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश आले आहे. टॅबला असलेल्या डोळ्यांच्या पासवर्डमुळे टॅब उघडणं सायबर तज्ज्ञांना जमलं नाही.

  • News18.com
  • Last Updated: Mar 30, 2021 05:37 PM IST
  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 30 मार्च: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि विकास आमटे यांची मुलगी डॉ. शीतल आमटे (Sheetal Amte Karajgi) यांनी आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. गेल्या चार महिन्यांपासून शीतल आमटे यांच्या आत्महत्येचा तपास सुरू आहे. या आत्महत्येमागे नेमकं कारण काय असेल याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. त्यामुळे तपास यंत्रणा आत्महत्येचं खरं कारण शोधण्यासाठी झटत आहेत. मात्र, तपासातील अडचणी कायम असल्याने आत्महत्येचं गूढ कायम आहे.

शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश आले आहे. टॅबला असलेल्या डोळ्यांच्या पासवर्डमुळे टॅब उघडणं सायबर तज्ज्ञांना जमलं नाही. त्यामुळे आता ही जबाबदार पुण्यातील सेन्ट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे सोपवण्यात आली आहे. तसेच चंद्रपूर पोलिसांनी शंका व्यक्त केल्याने लॅपटॉप आणि 2 मोबाईलही डाटा रिकव्हरीसाठी देण्यात आले आहेत.

IPL 2021 : या 5 अनकॅप खेळाडूंवर नजर, टीम इंडियात मिळेल एण्ट्री!

डॉ. शीतल आमटे यांनी आनंदवनातील राहत्या घरी 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. मात्र घातपाताचा कोणताही संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला नाही. डॉ. शीतल आमटे या मानसिक ताणावाखाली होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचेही बोलले जात आहे. मृत्यूपूर्वी शीतल यांनी एक पेंटिग ट्वीट केले होते. 'वॉर अँड पीस' असं कॅप्शन त्यांनी त्याला दिली होती. पेंटिगवर त्यांनी स्वत:चे नावही लिहिले आहे. या ट्वीटनंतर त्यांनी आत्महत्या केल्यानं अख्खा महाराष्ट्र हादरून गेला होता.

वयोवृद्ध कोरोना रुग्णाची आत्महत्या, नागपूरातील घटनेने खळबळ

त्यामुळे डॉ. शीतल आमटे यांच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये नेमकं काय आहे?  हे आता पुणे सेट्रेल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या तपासानंतरच पुढे येणार आहे.

Published by: News18 Digital
First published: March 30, 2021, 5:06 PM IST

ताज्या बातम्या